MLA Disqualification Petition : सभापती पद हे संविधानिक पद, न्यायालय निर्देश देवू शकत नाही - तवडकर

आमदारांविरुद्ध अपात्रतेप्रकरणी चोडणकरांनी याचिका दाखल केली होती
High Court of Bombay at Goa
High Court of Bombay at GoaDainik Gomantak

MLA Disqualification Petition : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांविरुद्ध अपात्रतेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी घटनेनुसार 90 दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश द्यावेत, यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.

High Court of Bombay at Goa
Mahadayi Water Dispute : म्हादई जल प्राधिकरण 'पणजी'त

यावर सभापतींनी प्रतिज्ञापत्र सादर करत आपले म्हणणे मांडले आहे. सभापती पद हे संविधानीक पद आहे. त्यामुळे न्यायालय आपल्याला निर्देश देऊ शकत नाही असे त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे. प्रतिवादी आमदारांना वेळ देत उच्च न्यायालयाने 10 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब केली.

चोडणकर यांनी सभापतींकडे आमदार अपात्रता याचिका गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला सादर केली आहे. घटनेनुसार सभापतींसमोरील अपात्रता याचिकेवरील सुनावणी 90 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे.

High Court of Bombay at Goa
Anmod Ghat : कर्नाटकातून बेळगावमार्गे गोव्याकडे येणारी अवजड वाहने जप्त

पण या याचिकेला तीन महिने होत आले तरी याचिकेतील प्रतिवादी असलेल्या त्या आठ आमदारांना सभापतींनी अजूनही नोटीस बजावलेली नाही व सुनावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे सभापतींना ही सुनावणी 90 दिवसांत पूर्ण करण्याची सूचना करावी अशी विनंती चोडणकर यांनी याचिकेत केली आहे.

चोडणकर यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत सभापतींसह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठही आमदारांना प्रतिवादी केली आहे. त्यामध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, संकल्प आमोणकर व आलेक्स सिक्वेरा यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com