Goa Rajbhavan Bonsai Garden: देशातील सर्वात मोठे बॉन्साय उद्यान गोव्याच्या राजभवनात

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई राबवणार प्रकल्प
Goa Rajbhavan Bonsai Garden
Goa Rajbhavan Bonsai GardenDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Rajbhavan Bonsai Garden: देशातील सर्वात मोठे बॉन्साय उद्यान गोव्याच्या राजभवनात उभारण्याचा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा मनोदय आहे. त्याची तयारीही सुरू झाल्याची माहिती आहे.

Goa Rajbhavan Bonsai Garden
Goa Job Fraud Case: गोव्याच्या तरूणीला परदेशात बनवले मोलकरीण; चांगल्या नोकरीच्या आमिषाने फसवणूक

राज्यपाल पिल्लई यांनी बॉन्साय या कलेविषयी एक पुस्तक लिहिले आहे. हे राज्यपाल पिल्लई यांचे दोनशेवं पुस्तक असणार आहे.

तत्पुर्वी काही पुस्तकांचे प्रकाशन 28 एप्रिल रोजी केरळमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.

दरम्यान, बॉन्सायला मराठीत वामन वृक्ष असेही म्हणतात. ही एक कला आहे. भारतीय कला असूनही त्याचा म्हणावा तितका प्रसार, प्रचार झालेला नाही.

भारतात आयुर्वेदात पुर्वी कढई, छोट्या प्लेटमध्ये वाढवल्या जाणाऱ्या वनस्पतींचा उल्लेख आहे. बौद्ध भिक्कुंनी ही कला चीन आणि नंतर जपानमध्ये नेली. तथापि, चीन, जपानमधून मोठ्या प्रमाणात बोन्साय वृक्ष निर्यात केले जातात.

Goa Rajbhavan Bonsai Garden
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरांमध्ये मोठी घट; जाणून घ्या आजचे दर...

राज्यपालांच्या मते, ही कला भारतात जन्म पावूनही दुलर्क्षित राहिली. त्यामुळेच राजभवनच्या उद्यानात वामन वृक्ष उद्यान उभारण्यात आले आहे. येथे सुमारे 72 बॉन्साय आहेत. ही संख्या यापुढील काळात शंभराच्याही पुढे नेण्यात येणार आहे.

देशातील सर्वाधिक मोठे आणि अधिक बॉन्साय असलेले उद्यान गोव्याच्या राजभवानात असावे, अशी राज्यपालांची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर फंडातून हे काम केले जाणार असल्याचीही माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com