GMC : गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली सर्वात अवघड शस्त्रक्रिया...

इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीच्या युनिट अंतर्गत महाधमनी एन्युरीझमचे आजारावर शस्त्रक्रिया
GMC
GMCDainik Gomantak

गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दक्षिण गोव्यातील 64 वर्षांच्या पुरुष रुग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया अवघड होती परंतु गोमॅकोतील डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडत रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले. रुग्ण निरोगी असून त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

GMC
Colvale: 24 तास उलटूनही कोलवाळ भंगारअड्ड्यांची आग अटोक्यात नाहीच

गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या 64 वर्षीय रुग्णावर इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीच्या युनिट अंतर्गत महाधमनी एन्युरीझमचे आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया अवघड होती. याबाबतची माहिती कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, "या शस्त्रक्रियेसाठी 12 लाख रुपयांचा खर्च येणार होता. मात्र आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या पुढाकाराने व गोवा सरकारच्या साथीने ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

गोवा सरकार लोकांना गोमेकॉत सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत देण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही अशी प्रकरणे दुर्मीळ आसतात व त्यांचे जीवन मौल्यवान आहे. मेडीकल स्कीमची मर्यादा ही 3 लाख रुपये आहे व अशा दुर्मीळ प्रकरणांसाठी 8 लाख रुपये गोवा सरकार देते. अशा विशेष प्रकरणांसाठी आम्ही सरकारकडे ही मर्यादा वाढवण्याची विनंती केली आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला त्याच्या ओटीपोटात महाधमनी एन्युरिझम होता. रुग्णाची खुली शस्त्रक्रिया करणे अवघड होते. त्याच्यावर स्टेंटने उपचार करण्यात आले. रुग्ण निरोगी असून त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com