Goa Leopard: ब्लॅक पँथरसाठी लावलेल्‍या पिंजऱ्यात अडकला बिबट्या; वंडाळा गावातील घटना

ब्लॅक पँथरचा मोर्चा तळसाय गावाकडे
Leopard In Goa
Leopard In GoaDainik Gomantak

Goa Leopard: धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील वंडाळा गावात धुमाकूळ घालणारा व पाळीव प्राणी फस्‍त करणारा ब्लॅक पँथर बाजूलाच राहिला, पण त्‍याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात रात्री 3 वाजता एक बिबटा जेरबंद झाला.

Leopard In Goa
Konkan Railway: गोव्यात करा ख्रिसमस, न्यू ईयरचे सेलिब्रेशन; कोकण रेल्वेतर्फे धावणार विशेष रेल्वेगाड्या

कुळे वन विभागचे अधिकारी रवी शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धारबांदोडा वन विभागाने वंडाळा गावात अतुल नाईक यांच्या घरासमोर 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पिंजरा लावलेला होता.

मात्र ब्लॅक पँथरने आपला मोर्चा तळसाय गावाकडे वळविल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काल रात्री या भागात बिबट्या आला आणि पिंजऱ्यात भक्ष्‍य म्‍हणून ठेवलेल्‍या कुत्र्याला पकडण्यासाठी आत शिरला व फसला.

नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याची रवानगी बोंडला अभयारण्‍यात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com