तुये पंचायत क्षेत्रातील सोणये पालये या भर लोक वस्तीतील जेनेफर व इल्सी डिसुझा यांच्या घराच्या गॅलरीमध्ये पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने प्रवेश करून बसलेल्या श्वानावर हल्ला केला आणि त्यांना आपल्या जबड्यात घेऊन जखमी केले.
कुत्रा का ओरडतो म्हणून जेनेफर बाहेर आल्या. त्यावेळी दरवाजाचा आवाज आल्यामुळे वाघाने त्या कुत्र्याला तेथेच सोडून पळ काढला. तशीच घटना काल पहाटे एलसी डिसुझा यांच्या घराच्या गॅलरीमध्ये येऊन श्वानाला पकडले. त्याने त्या श्वानाला जबर जखमी केले.
आरडाओरडा झाल्यामुळे बिबट्या पळून गेला. ही घटना सलगपणे दोन दिवस भरवस्तीत घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. येथील महिलांनी हा बिबट्या येऊन आमच्या मुलांना तर नेणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली. लवकरात लवकर याचा काय तो बंदोबस्त करावा विनंतीही त्यांनी यावेळी केली.
विकासाच्या नावावर डोंगर माळरानावरील झाडे झपाझप कापली जातात. त्यामुळे बिबटे लोक वस्तीत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केली.
स्थानिक पंच सदस्य उदय मांजरेकर यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. जंगली जनावरे लोक वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक वस्तीमधील श्वानांचा जीव धोक्यात असण्याबरोबरच आता मनुष्यांचाही जीव धोक्यात आलेला आहे. मागच्या सहा वर्षापासून तुये परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचे चित्र दिसून येते.
वेळोवेळी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून वाघांच्या चालीवर तो कुठे जातो, याची तपासणी करण्याची ही मागणी केली. परंतु वन खात्याने आजपर्यंत कसल्याच प्रकारच्या हालचाली केल्या नसल्याने उदय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
केवळ पिंजरा घालून वाघ या पिंजऱ्यात येणार नाहीत. त्यांच्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी, तज्ञांनी या वाघाला पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी मांजरेकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.