National Games IN Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज शानदार समारोप

National Games IN Goa: उपराष्ट्रपतींची उपस्थिती: सिरसाट यांचे गायन
37th National Games Goa 2023
37th National Games Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

National Games IN Goa: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा पडदा उद्या (गुरुवारी) दुपारी 4 वाजता उपराष्‍ट्रपती जगदीप धनकड यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बक्षीस वितरण सोहळ्याने खाली येईल. सुमारे 10 हजार स्पर्धक, 28 स्पर्धा ठिकाणे आणि 43 क्रीडा प्रकार असा मोठा पसारा राज्याने मुक्तीनंतर प्रथमच अनुभवला. गेली 12 वर्षे यंदा होणार, होणार अशी आवई उठणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन यंदा खरोखरच झाले आणि दिमाखदार उद्‍घाटन सोहळ्यामुळे स्पर्धा स्मरणीय ठरली.

37th National Games Goa 2023
Heavy Rain In Goa: फोंडा बसस्थानक भागामध्ये पाणी

फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारीक उद्‍घाटन करण्यात आले होते. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या उपस्थितीत ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर या स्पर्धेचा समारोप होईल. स्वयंपूर्ण बग्गी हे उद्‍घाटन सोहळ्यासाठी आकर्षण होते.

आता समारोपाला तसेच काय नवीन पाहण्यास मिळेल का, याविषयी उत्सुकता आहे. प्रत्यक्षात समारोप सत्राला दुपारी ४ वाजता सुरवात होणार असली तरी कार्यक्रमांची सुरवात दुपारी २.३० वाजताच होणार आहे.

37th National Games Goa 2023
National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमान गोव्याचे देदीप्यमान यश, ‘टॉप टेन’मध्ये स्थान

बनसोडे दाखल

या स्पर्धेत महाराष्‍ट्राने सर्वाधिक ७५ सुवर्णांसह २१९ पदके मिळवत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. सेना दलाचे पदक तक्त्यावरील वर्चस्व त्यांनी मोडून काढले. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे बुधवारी गोव्यात दाखल झाले असून त्यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.

सोनिया सिरसाट यांच्या सादरीकरणाने या सोहळ्यास सुरवात होईल. त्यानंतर ४५ मिनिटांसाठी स्पर्धा गीताच्या तालावर सादरीकरण होईल. उपराष्ट्रपती कार्यक्रमस्थळी ३.४५ वाजता पोचतील. त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पुरुष-महिला खेळाडू तसेच सर्वाधिक पदके मिळवलेल्या संघांचा गौरव करण्यात येणार आहे.

हा सोहळा दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत चालणार असून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री गोविंद गावडे, सभापती रमेश तवडकर, भारतीय ऑलिपिंक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल उपस्थित राहतील.

गोव्याने या स्पर्धेत यजमान या नात्याने शानदार कामगिरी करताना पहिल्या दहांत क्रमांक पटकावला. लगोरी, गताका आणि मिनी गोल्फ या क्रीडा प्रकारांचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून स्पर्धेत समावेश कऱण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com