केरीतील सरकारी शाळा ‘मॉडेल स्कूल’ बनवणार : डॉ. दिव्या राणे

बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
Annual Prize Distribution ceremony at GHS Keri
Annual Prize Distribution ceremony at GHS KeriDainik Gomantak
Published on
Updated on

केरी-सत्तरीतील सरकारी विद्यालयातील मुलांचा शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात विकास घडवण्यासाठी विविध साधनसुविधा पुरवण्यात येतील. ही शाळा ''मॉडेल स्कूल'' बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

केरी येथील सरकारी विद्यालयाचे स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा विद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात झाला. यावेळी डॉ. राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

Annual Prize Distribution ceremony at GHS Keri
Goa Pink Force : ‘पिंक फोर्स’ सेवेची चाके अडखळली !

व्यासपीठावर सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस, केरीच्या सरपंच दीक्षा गावस, उपसरपंच भिवा गावस, मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र हळीत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेश्मा गावस, पंचसदस्य उस्मान सय्यद, तन्वीर पांगम, संदीप ताटे, पालक-शिक्षक संघ सदस्य विजय गावस, दशरथ मोरजकर, विष्णू च्यारी, संतोष नाईक, साहाय्यक शिक्षक दिगंबर भजे आदी उपस्थित होते.

Annual Prize Distribution ceremony at GHS Keri
Mann Ki Baat : कलाकार दत्तगुरू वांतेकर यांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

सभागृहात थोर नेत्यांची छायाचित्रे

यावेळी मामलेदार दशरथ गावस, विजय गावस, सुनील केरकर, कृष्णा माईणकर यांनी भारतातील थोर नेते आणि स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांच्या संक्षिप्त माहितीसह छायाचित्रे साने गुरुजी सभागृहाच्या भिंतीवर लावली. याबद्दल मुख्याध्यापक नाईक यांनी त्यांचे आभार मानले.

गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक

गोव्यात नावलौकिक प्राप्त असलेले हे विद्यालय असून येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले, तर क्रीडा क्षेत्रात राज्यभर चमकत आहेत. त्यामुळे ते कौतुकास प्राप्त आहेत, असे राणे म्हणाल्या. यावेळी केरी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले मामलेदार दशरथ गावस यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com