Town and Country Planning Department : राणे विरुद्ध लोबो वाद भडकला

नगरनियोजन खात्यातील कथित रूपांतरावरून घोटाळे लवकरच उघड करू : विश्वजीत राणे
TCP
TCPDainik Gomantak
Published on
Updated on

Town and Country Planning Department नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे आणि भाजपचे आमदार मायकल लोबो यांच्यात नगरनियोजन खात्यातील कथित रूपांतरावरून जोरदार वाद भडकला आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे येत्या विधानसभा अधिवेशनात मांडू आणि दोषींवर कारवाई करू, असे रोखठोक आव्हान मंत्री राणे यांनी दिले आहे.

राणे यांनी ट्विट् करत म्हटले आहे की, आमच्याकडे आधीपासूनच नगरनियोजन विभागातील दोन अधिकारी आहेत. यापूर्वी एसएलसी आणि संगणक तज्ज्ञांसह इतरांनी प्रत्यक्षात योजना फेरफार करून तयार केल्या आणि नियोजनाच्या अयोग्य प्रक्रियेत मदत केली.

टीसीपी विभागाकडे तथाकथित तर्कसंगत डेटा आहे, जो आता माझ्या ताब्यात आहे. त्याची कसून छाननी केली जाईल आणि तो सार्वजनिकही केला जाईल.

TCP
Goa Mines: खाणकामाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; राज्यातील खाणी लवकरच..

यापूर्वीच विभागाच्या ताब्यात असलेला अहवाल विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी प्रसिद्ध केला जाणार आहे. गोवा आणि गोमंतकीयांच्या हिताविरोधात काम करणाऱ्या मुख्य दोषींना येत्या विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहासमोर हजर केले जाईल.

घोटाळ्याचा तपशील सार्वजनिक करणार

हडफडे येथील एक प्रकल्प, जो फार्म हाऊस म्हणून मंजूर झाला आणि नंतर त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. हे एसएलसी सदस्यांनी त्यांच्या पदाचा कसा गैरवापर केला, त्याचे अद्वितीय उदाहरण आहे.

इतर अनेक घोटाळे त्यांच्या तपशिलांसह लवकरच सार्वजनिक केले जातील. समितीसोबतच एक आऊटसोर्स संगणक सॉफ्टवेअर कंपनीही या बेकायदेशीर कामात सहभागी होती.

हे सर्व तपशील आणि संबंधितांची नावे अधिकृत कागदपत्रांच्या आधारे सार्वजनिक केले जातील, असे मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com