Union Minister Rajeev Chandrasekhar Booked in Kerala For Religious Hatred: केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याविरोधात केरळमध्ये धार्मिक द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (A) आणि कलम 120 (ओ) अंतर्गत केंद्रीय मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, केरळ पोलिसांच्या सायबर सेलने कोची बॉम्बस्फोटासंदर्भात सोशल मीडियावरील मंत्र्यांचे अलीकडील वक्तव्ये आणि मलप्पुरम जिल्ह्यात इस्लामिक गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हमास नेत्याच्या भाषणासंदर्भात त्यांनी द्वेषपूर्ण वक्तव्य केले होते.
दरम्यान, सोमवारी चंद्रशेखर यांनी केरळचे (Kerala) मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर कट्टरपंथी घटक, कट्टरतावादाबद्दल सहिष्णु असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी कोचीच्या कलामास्सेरी भागात झालेल्या स्फोटानंतर 'तुष्टीकरणाचे राजकारण' केल्याचा आरोप केला होता. एवढ्यावरच न थांबता चंद्रशेखर यांनी कारवाईची धमकी दिली होती.
केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, 'मी कधीही कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल बोललो नाही. मी 'हमास'चा विशेष उल्लेख केला आहे. मात्र, पिनाराई विजयन यांना हमासची तुलना एका विशिष्ट समुदायाशी करायची आहे.'
28 ऑक्टोबर रोजी मलप्पुरम येथे पॅलेस्टाईन समर्थक रॅलीदरम्यान हमासचा (Hamas) माजी प्रमुख खालिद मशाल याच्या ऑनलाइन भाषणाचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, डावे आणि काँग्रेस दोघेही राज्यात कट्टरपंथी घटकांना हात पाय पसरु देत आहेत.
दुसरीकडे, कोचीच्या कलामसेरी येथे रविवारी एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार तर 50 हून अधिक जखमी झाले. सुमारे 2,500 लोक प्रार्थना करत असताना सकाळी 9.30 च्या सुमारास कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा स्फोट झाला.
अधिका-यांनी सांगितले की, घटना स्थळाच्या प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की जमावाला लक्ष्य करण्यासाठी टायमर-आधारित कमी-तीव्रतेचा IED वापरण्यात आला होता.
हल्ल्याच्या काही तासांनंतर डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आणि पोलिसांना शरण आला. शरण आल्यानंतर तो म्हणाला की, तो धार्मिक गटाचा सदस्य होता, परंतु त्यांच्या काही शिकवणींमुळे तो नाराज होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.