Verna: मारहाण प्रकरण भोवलं; वेर्णा ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

''पाच लाखाचे नुकसान केल्याचा आरोप''
 Anthony Braganza
Anthony BraganzaDainik Gomantak
Published on
Updated on

वेर्णा येथील ग्रामपंचायत सदस्य अँथनी ब्रागांझा यांच्यावर मालमत्तेत घुसखोरी करत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रागांझा यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून यामध्ये ते तोडफोड करताना स्पष्ट दिसत आहेत.

(A case has been registered against Anthony Braganza, Gram Panchayat member of Verna)

 Anthony Braganza
Mopa Airport: गोवा नामकरण समितीतर्फे ढवळीकरांच्या प्रतिमेचे म्हापशात दहन

मिळालेल्या माहितीनुसार वेर्णा ग्रामपंचायत सदस्य अँथनी ब्रागांझा यांच्यावर घुसखोरी आणि मारहाण प्रकरणी एकाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार ब्रागांझा यांनी तक्रारदाराशी वाद घातला आहे. या वादादरम्यान तक्रारदाराच्या मालमत्तेत घुसखोरी केली व त्याला मारहाण करत धमकी दिली, व चिकन शॉप पाडले आहे. यात तक्रारदाराचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

 Anthony Braganza
Jit Alorkar: अन् चक्क आमदार बनले वाहतूक पोलिस!

अँथनी ब्रागांझा यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून, यात अँथनी ब्रागांझा हे आपल्या हातात हातोडा घेत पत्र्याचे शेड पाडताना दिसत आहेत. तसेच पायाने उभारलेले पत्रे पाडताना दिसतायेत. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ब्रागांझा यांची बाजु समोर आली नसुन हा वाद कोणत्या कारणामुळे झाला आहे. हे देखील समोर आलेले नाही.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार पंच सदस्याने तक्रारदाराच्या शेजाऱ्याला मारहाण करून धमकावले आणि 5 हजार रुपयांचे लाकडी टेबल आणि कुलूप चोरले आहे. चौकशीसाठी ब्रागांझा यांना लवकरच नोटीस बजावली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa verna illegal call center busted
Uttar Pradesh Youth Death In Goa
Divyang Rights Association
Oppose Mega Projects Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com