Goa Accident : शिरोडा येथे एका कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर जखमी; कारचालकावर गुन्हा दाखल
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak

राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. 2019 ते मार्च 2023 या कालावधीत गोव्यात तब्बल 12,308 अपघात नोंदवले गेले आहेत. बेशिस्तपणे वाहन चालवणे, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणे, खराब रस्ते, अंदाज न येणारे गतिरोधक अशा अनेक कारणांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

2019 ते मार्च 2023 पर्यंत जे 12,308 अपघात झाले यात 1050 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर या अपघात प्रकरणांमध्ये 30,16,501 दंड ठोठावण्यात आल्याची नोंद झाली आहे.

Goa Accident
Goa Accident: वरूणापुरी जंक्शन येथे कर्नाटकच्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; डीफेन्स कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

दरम्यान, आज सकाळी शिरोडा येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्य झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व कार चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पनाईघाट पंचवाडी शिरोडा येथे एका कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार दामिनिया गुदिन्हो (72) हिचा मृत्यू झाला तर सिरीला गुदिन्हो (67) ही गंभीर जखमी झाली. फोंडा पोलिसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा नोंद केला असून पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

Goa Accident
Chorla Car Accident: चोर्ला घाटात दरीत कोसळली कार; गाडीतील तिघांना वाचविण्यासाठी मध्यरात्री राबवली मोहिम...

दरम्यान, आज राज्यात कर्नाटक-गोवा यांना जोडणाऱ्या चोर्ला घाटात तसेच मुरगाव तालुक्यातील वरुणापुरी जंक्शन येथे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली होती.

कर्नाटक-गोवा यांना जोडणाऱ्या चोर्ला घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात बॅलेनो कार थेट दरीत कोसळली. या कारमध्ये तिघेजण अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन केंद्रातील जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऐन मध्यरात्री बचाव मोहिम राबवत अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून या तिघांचाही जीव वाचला.

मुरगाव तालुक्यातील वरुणापुरी जंक्शन येथे भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने बाईकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका संरक्षक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अरविंद पासवान असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com