Panaji News : कला क्षेत्राला उत्तम भविष्य : संध्या पुरेच्या

Panaji News : उदघाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. गंगुबाई हनगल गुरुकुल ट्रस्टचे विद्यार्थी व पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या शिष्यांचे गायन झाले.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News : पणजी, युवा कलाकारांना प्रतिष्ठेचे व्यासपीठ देण्यासाठी देशात ७५ कलोत्सव आयोजित केले असून सोमवारी गोव्यात या महोत्सवाचा समारोप होत आहे.

युवा प्रतिभा कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे कारण कला क्षेत्राला उत्तम भविष्य आहे, असे संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्या पुरेच्या यांनी सांगितले.

यावेळी कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, सचिव राजू दास उपस्थित होते. सोमवारी संध्याकाळी ६ वा. होणाऱ्या गायन, वादन, नृत्याच्या तिसऱ्या सत्राने या कलोत्सवाचा समारोप होईल.

Panaji
Goa Accident Case: पर्वरी आणि वेर्णा येथे अपघात; अपघातांची मालिका सुरुच

उदघाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. गंगुबाई हनगल गुरुकुल ट्रस्टचे विद्यार्थी व पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या शिष्यांचे गायन झाले. गोव्यातील सरस्वती कला मंडळाने गोफ नृत्य सादर केले.

चयादीह नवीन भारती छावू नृत्य पार्टीने पुरुलिया छावू नृत्य सादर केले. गोवा कला अकादमीच्या कलाकारांनी कथ्यक व भरतनाट्यम सादर करून रंगत आणली.

रविवारी अंशुमन महाराज आणि साथी यांचा वाद्यमेळ आविष्कार रंगला त्यानंतर सम्राज्ञी आईर यांचे नाट्यगीत गायन,अल्ताफ सिद्धी पथक गुजरातचे सिद्धी धमाल नृत्य व केरळ येथील कला मंडळ नीरज समूहाचे कथकली नृत्य रंगले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com