वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

Student Runs Away For Phone: वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून एका १५ वर्षीय शाळकरी मुलाने घर सोडले. हा मुलगा थेट रेल्वे पकडून नागपूरला निघाला
kudal station student rescue
kudal station student rescueDainik Gomantak
Published on
Updated on

Teenager leaves Home for Mobile: मोबाईल फोनचा अतिवापर करत असल्यामुळे वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून एका १५ वर्षीय शाळकरी मुलाने घर सोडले. हा मुलगा थेट रेल्वे पकडून नागपूरला निघाला होता, मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला कुडाळ स्थानकावर ताब्यात घेऊन सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.

ही घटना नुकतीच घडली. हा मुलगा पर्वरी येथे राहणारा असून तो इयत्ता नववीमध्ये शिकतो. तो सतत मोबाईल वापरत असल्यामुळे वडिलांनी त्याचा मोबाईल काढून घेतला. याचा त्याला इतका राग आला की, त्याने घर सोडून थेट थिवी रेल्वे स्थानक गाठले. तिथून त्याने मडगाव-नागपूर मार्गावरील रेल्वे पकडली आणि तो नागपूरला निघाला.

kudal station student rescue
Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

मुलाच्या पालकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ पर्वरी पोलिसांशी संपर्क साधला. पर्वरी पोलिसांनी लागलीच कोकण रेल्वे पोलीस फोर्सला या घटनेची माहिती दिली. कोकण रेल्वे पोलीस फोर्सच्या कणकवली विभागाने तत्काळ कार्यवाही करत स्थानकांवरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुलाचा शोध सुरू केला.

या प्रयत्नांमुळे पोलिसांनी त्या मुलाला कुडाळ रेल्वे स्थानकावर गाडीतून उतरताच ताब्यात घेतले. शहानिशा केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी पर्वरी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. रेल्वे पोलीस फोर्सचे निरीक्षक राजेश सुरवादे, सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील व कॉन्स्टेबल विक्रमजीत यांनी पर्वरी व पेडणे पोलिसांच्या सहाय्याने ही कामगिरी यशस्वी केली. त्यानंतर मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com