Mandvi: फेरीबोट
Mandvi: फेरीबोट Dainik Gomantak

Mandvi: सारमानस-टोंक जलमार्गावरील फेरीबोट मांडवी नदीत भरकटली

Mandvi नदीत फेरीबोट पिळगावच्या दिशेने भरकटू लागली. त्याबरोबर फेरीबोटीतील प्रवाशांवर आकांत आला.
Published on

डिचोली: सारमानस-टोंक जलमार्गावरील एक फेरीबोट मांडवी(Mandvi) नदीत भरकटकण्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. फेरीबोट भरकटली, तरी सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नसल्याची माहिती मिळाली आहे. सारमानस धक्क्याजवळ फेरीबोटीच्या क्लझ प्लेटमध्ये बिघाड झाल्यानंतर ही फेरीबोट पिळगावच्या दिशेने भरकटू लागली. त्याबरोबर फेरीबोटीतील प्रवाशांवर आकांत आला. (A boat on Sarmanas-Tonk waterway lost its way in Mandvi River)

Mandvi: फेरीबोट
Goa: राज्यात दहावीचा निकाल 99.72 टक्के

फेरीधक्क्याजवळच असलेल्या सेझा कंपनीच्या धक्क्यावरील बार्जच्या साहाय्याने फेरीबोट सुरक्षितपणे फेरी धक्क्यावर आणण्यात आली. त्यामुळे संकट टळून प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. मागील वर्षीही खराब हवामानामुळे या जलमार्गावरील एक फेरीबोट भरकटून पिळगावपर्यंत पोचली होती. त्यावेळीही कोणतीही वाईट घटना घडली नव्हती.

Mandvi: फेरीबोट
Goa: कोलवा समुद्र किनारा परिसरात 200 फुलांच्या रोपटांची लागवड

नवीन फेरीबोटी हव्यात

सारमानस-टोक जलमार्ग लांब अंतराचा आहे. या जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या फेरीबोटी जुनाट झाल्या आहेत. या जलमार्गावर नवीन फेरीबोटींची मागणी प्रलंबित आहे. आता तरी या जलमार्गावर नवीन फेरीबोटी सुरु कराव्यात. अशी मागणी सारमानस येथील पंच अनिल नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com