पाहावं ते नवलचं! पक्ष्याचा 'मन की बात' मध्ये सहभाग, गोव्याच्या पर्यटन मंत्र्याच्या बसला खांद्यावर; Watch Video

Goa tourism minister viral video: ज्यावेळी पंतप्रधानांनी पक्षी आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल चर्चा केली, त्याचवेळी हा अनपेक्षित प्रसंग घडला
bird sits on minister shoulder
bird sits on minister shoulderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या खांद्यावर एका पक्ष्याने बसून सर्वांनाच सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे, ज्यावेळी पंतप्रधानांनी पक्षी आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल चर्चा केली, त्याचवेळी हा अनपेक्षित प्रसंग घडला.

मंत्र्यांच्या कार्यालयाने शेअर केलेला आणि नंतर वृत्तसंस्था पीटीआयने प्रसारित केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये खंवटे शांतपणे हसत, संयम राखत बसलेले दिसत आहेत, तर पक्षी त्यांच्या खांद्यावर आरामात बसून होता. हा कोणताही पूर्वनियोजित नसलेला क्षण, पंतप्रधानांच्या पक्ष्यांवरील भाषणाशी जुळल्याने तो अधिकच लक्षवेधी ठरला.

आपल्या 'मन की बात' संबोधनादरम्यान, पंतप्रधानांनी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकत्याच झालेल्या पक्षीगणनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “काझीरंगा गेंड्यांसाठी प्रसिद्ध असले तरी, यावेळी चर्चेचा विषय आहे तिथली गवताळ मैदाने आणि त्यात राहणारे पक्षी. येथे पहिल्यांदाच 'ग्रासलँड बर्ड सेन्सस' करण्यात आला असून, त्यात अनेक दुर्मिळ प्रजातींसह ४० हून अधिक पक्ष्यांची ओळख पटली आहे. यात तंत्रज्ञानाने कमाल केली. पक्ष्यांना त्रास न देता त्यांना ओळखण्यासाठी ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यात आला. जेव्हा तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता एकत्र येतात, तेव्हा निसर्गाला समजून घेणे किती सोपे आणि सखोल होते!”

bird sits on minister shoulder
Viral Video: सोशल मीडियावर धूम! 'हा' व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच बघा, तो पुन्हा व्हायरल झालाय

एकीकडे पंतप्रधान पक्षी आणि तंत्रज्ञानावर बोलत होते, तर दुसरीकडे गोव्यात मंत्र्याच्या खांद्यावर बसलेल्या या पक्ष्याने आपला संदेश कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता, जुन्या पद्धतीनेच, अचानक प्रकट होऊन दिला. हा प्रसंग निसर्ग आणि मानवी जीवनातील सुंदर समन्वयाचे एक अनोखे उदाहरण ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com