Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Bangkok Market Shooting: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील प्रसिद्ध ऑर तो कोर अन्न बाजारात एका ६१ वर्षीय व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला.
Bangkok Market Shooting
Bangkok Market ShootingDainik Gomantak
Published on
Updated on

Bangkok Market Shooting 6 Killed

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील प्रसिद्ध ऑर तो कोर बाजारात एका ६१ वर्षीय व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात किमान सहा जणांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर या व्यक्तीने स्वतःवरही गोळी झाडली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्लेखोराने अचानक बाजारात गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करत अंधाधुंद गोळ्या झाडल्या. काही क्षणांतच बाजारात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बँकॉकच्या बँग सु जिल्ह्यातील ऑर तो कोर मार्केटमध्ये घडली, जो भाग पर्यटकांमध्ये लोकप्रिय मानला जातो.

Bangkok Market Shooting
Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

हल्लेखोर कोण ?

पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली असून, तो बँकॉकमधीलच रहिवासी होता. बँग सु जिल्ह्याचे उपपोलिस प्रमुख व्होरापत सुकथाई यांनी सांगितले की, सध्या या हल्ल्याच्या हेतूचा तपास सुरु आहे.

Bangkok Market Shooting
Goa Crime: भरघोस व्याजाच्या आमिषाने दाम्पत्याला 16 लाखांचा गंडा, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामध्ये एका व्यक्तीला हातात बंदूक घेऊन बाजारात फिरताना दाखवले आहे, तर काही व्हिडिओंमध्ये घबरलेले नागरिक आणि अफरातफरी दिसून येते. मात्र, हे व्हिडिओ प्रत्यक्ष घटनेशी संबंधित आहेत की नाही याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

बँकॉक पोलिसांनी घटनास्थळ सील करून अधिक तपास सुरू केला आहे. बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना साक्ष घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. हा हल्ला कोणत्याही संघटनेशी संबंधित आहे का, याबाबत तपास सुरू आहे.

हा हल्ला अशा वेळी घडला आहे जेव्हा थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमा वाद चिघळलेला आहे. रविवारी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांनी युद्धबंदी आणि चर्चेचे संकेत दिले होते. याआधी झालेल्या संघर्षांमध्ये ३३ जणांचा मृत्यू, तर १ लाख ६८ हजाराहून अधिक लोकांचे विस्थापन झाल्याचे वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com