Online Fraud: ऑनलाईन 85 हजारांना गंडा; संशयिताला दिल्लीत अटक

मडगाव येथील श्रीपाद नाईक या युवकाला ऑनलाईन पद्धतीने 85 हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी संशयिताला दिल्ली येथे जाऊन अटक केली.
online fraud
online fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मडगाव येथील श्रीपाद नाईक या युवकाला ऑनलाईन पद्धतीने 85 हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित साहिल राज कुमार (31) याला दिल्ली येथे जाऊन अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

(85 thousand online fraud Suspect arrested in Delhi)

online fraud
Goa Petrol-Diesel Price: जाणून घ्या आजचे गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव येथील श्रीपाद नाईक हा 10 ऑगस्ट रोजी पणजीत आला होता. त्यावेळी त्याला एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला व त्याने या तक्रारदारला ईमेल माहिती देण्यास सांगितले. त्याची ईमेल माहिती घेण्‍याबरोबरच कॉल केलेल्या संशयिताने त्याची वैयक्तिक सर्व माहिती घेतली व नंतर गंडा घातला.

online fraud
Ambulance Issue: हाकेच्या अंतरावर यायला ‘108’ ला तब्‍बल पाऊण तास!

बँकेत बोगस नावाने खाते

तक्रार दाखल झाल्‍यानंतर पणजी पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला व काही तासांतच संशयित साहिल कुमार याची माहिती मिळाल्यावर पणजी पोलिस स्थानकाचे एक पथक दिल्लीला गेले. तसेच संशयिताला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने बोगस नावाने बँकेत खाते उघडल्‍याचे व या बँक खात्याचा वापर लोकांना फसवून पैसे लुटण्यासाठी करीत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. पोलिस सर्व अंगांनी तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com