पणजी : पणजी जिमखाना मेंबर्स लीग टी-20 क्रिकेट (Cricket) स्पर्धेच्या क्वालिफायर-1लढतीत प्रेस्कॉन पँथर्सने धेंपो चॅलेंजर्सला नमविले होते. त्याचीच पुनरावृत्ती रविवारी अंतिम लढतीत झाली.
बुद्धदेव मंगलदास याच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर प्रेस्कॉन पँथर्सने अंतिम लढत 5 विकेट्स राखून जिंकली आणि पहिल्या पणजी जिमखाना मेंबर्स लीग विजेतेपदाचा झळाळता करंडक पटकावला. सामना कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.
विजयासाठी 117 धावांचे लक्ष्य प्रेस्कॉन पँथर्सने शेवटचे तीन चेंडू आणि पाच विकेट राखून गाठले. स्वयम नाईक (नाबाद 31) व बुद्धदेव (24) यांच्या दमदार फलंदाजीमुळे त्यांना आव्हान पार करणे सोपे ठरले. त्यापूर्वी धेंपो चॅलेंजर्सला फलंदाजीत सूर गवसला नाही. त्यांचा डाव 19.4 षटकांत 116 धावांत आटोपला.
संक्षिप्त धावफलक
धेंपो चॅलेंजर्स : 19.4 षटकांत सर्वबाद 116 (नैषाद कामत 13, मेहंक धारवाडकर 10, सरगम फळारे 10, आर्यन माशेलकर 25, किरण शिरवईकर 12, महेश गवंडे 14, नारायण कांबळी 2-9, विवेक कारापूरकर 2-13, रोहित साळगावकर 2-20, प्रज्योत रिवणकर 1-13, बुद्धदेव
मंगलदास 1-18) पराभूत वि. प्रेस्कॉन पँथर्स : 19.3 षटकांत 5 बाद 117 (प्रज्योत रिवणकर 15, प्रशांत पांगम 15, स्वयम नाईक नाबाद 31, बुद्धदेव मंगलदास 24, इफ्तिकार आगा 12, विवेक कारापूरकर 10, किरण शिरवईकर 1-13, अजय पेडणेकर 1-16, नकुल म्हामल 2-24, आर्यन माशेलकर 1-16).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.