पणजी: 15 ते 18 वयोगटातील 74 हजार 887 मुले राज्यात असून यापैकी 56 हजार 680 मुलांना लसीकरणाची पहिली मात्रा देण्यात आली आहे. हे प्रमाण 74 टक्के आहे. याशिवाय 12 ते 15 या वयोगटातील मुलांनाही लसीकरण देण्यासाठी केंद्रीय आरोग्य यंत्रणेने लसीकरणाच्या (Vaccination) मोहिमेची तयारी सुरू केली आहे. (Goa COVID-19 Vaccine 15-18 age group)
ज्या मुलांचे त्यांच्या स्वतःच्या शाळांमध्ये लसीकरण होऊ शकलेले नाही ते इतर उच्च माध्यमिक शाळांमध्ये जाऊन लस घेऊ शकतात. शाळेत न जाणारे देखील त्यांच्या घराच्या जवळच्या शाळेत जाऊन लस घेऊ शकतात. खासगी रुग्णालयांमद्धे सुद्धा लस उपलब्ध आहे. ज्याना वाट पाहण्यात वेळ वाया घालवायचा नाही ते खासगी रुग्णालयातून लस घेऊ शकतात, असे लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले.
केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना ओमिक्रॉन विषाणूवरील तातडीचा उपाय म्हणून कोव्हॅक्सिनची लस देण्यास सुरुवात झाली. राज्य प्रशासन आणि शिक्षण खात्याच्या वतीने ही लस सर्व शाळांमध्ये देण्यात येत असून 3 जानेवारीपासून या मोहिमेला सुरुवात झाली होती.
बूस्टर डोस सुरू
लसीकरणाचा तिसरा बूस्टर डोस (Booster Dose) ही राज्यात देण्यास सुरू झाला आहे. 60 वर्षांवरील इतर आजाराने त्रस्त असणारे, फ्रन्टलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांना ह्या लसीकरणाची मात्रा देण्यात येणार आहे. राज्यात असे 1 लाख 24 हजार 362 पात्र नागरिक असून यापैकी 10 हजार 259 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. लसीकरणाचे पहिले दोन्ही डोस झाल्यानंतर नऊ महिन्यांनी हा तिसरा बूस्टर डोस दिला जातो. मात्र, त्यासाठी अन्य अटी ही लागू आहेत. याशिवाय कोरोना झाल्यानंतर तीन महिने हा डोस घेता येत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.