Goa School: गोव्यातील 71 शाळांना देणार हुतात्म्यांची, स्वातंत्र्य सैनिकांची नावे

8 उच्च माध्यमिक शाळांनाही नावे देण्यात येणार आहेत
Goa Schools
Goa Schools Dainik Gomantak

पणजी: शिक्षण संचालनालय (DoE) 8 सरकारी उच्च माध्यमिक आणि इतर 71 सरकारी शाळांना गोवा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिक तसेच शहीदांची नावे देण्यात येणार आहे. DoE ने सांगितले की संबंधित पालक-शिक्षक संघटना आणि शाळा व्यवस्थापन समित्यांनी त्यांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेणे आवश्यक आहे.

(71 schools named after freedom fighters, martyrs in goa)

Goa Schools
Goa Rain Update: गोव्यात 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता

“या संदर्भात, संबंधित कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असुन, PTA, SMC/ SMDC ची संयुक्त बैठक बोलावून सदस्यांकडून ठराव घ्यावा,” असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी शाळा प्रमुखांना उद्देशून दिलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

“तसेच, शासकीय उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरातील/गाव/तालुक्यातील शहीदांची ओळख पटवून त्या व्यक्तीच्या कागदोपत्री पुराव्यासह रीतसर भरलेला PTA/SMC/SMDC चा ठराव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वातंत्र्यसैनिक/शहीद, यांचे नाव 22 नोव्हेंबर 2022 पूर्वी शाळेला देण्याचा प्रस्ताव आहे,”

Goa Schools
Goa Human Trafficking: 'वेश्याव्यवसायासाठी' महिलांची तस्करी गोव्यात सर्वाधिक

'राज्यातील सरकारी शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देणार' CM प्रमोद सावंत यांची घोषणा..

75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पेडणे येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमास प्रमूख उपस्थीत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरकारी शाळांच्याबद्दल घोषणा केली आहे. पेडणे येथील कार्यक्रमात त्यांनी केली घोषणा.

त्यांचे बलिदान कधीच वाया जाणार नाही....

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. ज्यांनी बलिदान दिले आहे. ते कधी वाया जाणार नाही. असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील सरकारी शाळांना स्वातंत्र्यसैनिकांचे नाव देणार असल्याची घोषणा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com