Panjim: हिंदूंनी जन्म हिंदू म्हणून न राहता कर्म हिंदू म्हणून समाजात वावरावे, असे मत भारत माता की जय संघटनेचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी येथे केले. श्रीराम जन्मभूमी कारसेवक सन्मान समितीतर्फे राज्यभरातील सुमारे 700 कारसेवकांना सन्मान करण्यासाठी रविवारी कला अकादमीत झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रा. सुभाष वेलिंगकर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अयोध्येतील आचार्य, तथा कारसेवक जगद्गुरू आचार्य परमहंस महाराज, तर सन्मानीय पाहुणे म्हणून अयोध्येतील साधू नारायण दास महाराज उपस्थित होते. तसेच संयोजक नितीन फळदेसाई,
अध्यक्ष गोविंद देव व इतर मान्यवर उपस्थित होते. सांकवाळ चर्चच्या ठिकाणी विजयादुर्गा देवीचे मंदिर होते, याचे पुरावे देखील आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, असे वेलिंगकर म्हणाले. कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
दरम्यान, राज्यभरातील सुमारे 700 कारसेवकांचा जगद्गुरू आचार्य परमहंस महाराज व नारायण दास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कारसेवकांचे अनुभव एकत्रित करून श्री विद्या प्रतिष्ठानतर्फे तयार केलेल्या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक आमोणकर यांनी केले. संपूर्ण सभागृहात उपस्थितांनी जय राम श्री राम जय जय राम, भारत माता की जय, जय श्री राम यासारख्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.