'प्रमोद सावंत राजीनामो दियात' म्हणत गोव्यात काल दिवसभर राजकीय राडा

आझाद मैदानाबाहेर परवानगी नसताना निदर्शने केल्याने पणजी पोलिसांनी आप व काँग्रेसच्या 74 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
7 political parties in Goa come together to demand resignation of Goa Chief Minister Pramod Sawant
7 political parties in Goa come together to demand resignation of Goa Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

पणजी: राज्याचे माजी व मेघालयाचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील कोविड काळातील भ्रष्टाचारासंदर्भात गौप्यस्फोट केल्यानंतर राज्यातील सात पक्ष आक्रमक बनले आहेत.

गोवा फॉरवर्ड व तृणमूल काँग्रेसने राज्यपालांना भेटून सावंत यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. काँग्रेस व आम आदमी पक्षाने निदर्शने करीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. आझाद मैदानाबाहेर परवानगी नसताना निदर्शने केल्याने पणजी पोलिसांनी आप व काँग्रेसच्या 74 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री त्यांना अटक केल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामिनावर त्यांची सुटका केली.

7 political parties in Goa come together to demand resignation of Goa Chief Minister Pramod Sawant
भाजप सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा: गोवा फॉरवर्ड

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर सरकारच्या राजीनाम्याची, बडतर्फ करण्याची व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्याचे पडसाद आज उमटले. विरोधकांनी राज्यपालांना निवेदन दिले. राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मगो, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचे वेळोवेळी विरोधकांकडून आरोप केले जात होते त्यात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भर घातली. आज दिवसभर राजधानी पणजीत विरोधकांकडून भ्रष्टाचारविरोधात निदर्शने करण्यात आली.

7 political parties in Goa come together to demand resignation of Goa Chief Minister Pramod Sawant
गोव्यातील सरकार बडतर्फ करा!

सरकारविरोधी नारेबाजीने गाजले मैदान

राज्यपालांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या वक्तव्याविरोधात काल दुपारी 3.30 वा. निदर्शने केली. यावेळी या पक्षाचे सुमारे 500 हून अधिक कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यात सुरुवात केल्यावर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली. पक्षाकडे निदर्शने करण्याची परवानगी नसल्याच्या कारणावरून 36 जणांना ताब्यात घेतले व आगशी येथील पोलिस स्थानकात नेऊन अटक केली. त्यानंतर 5.15 वा. काँग्रेसचे सुमारे 50 नेते व कार्यकर्ते आझाद मैदानावर जमा झाले. त्यांनीही मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी करीत निदर्शने सुरू केली असता 11 जणांना ताब्यात घेऊन पर्वरी पोलिस स्थानकार नेऊन अटक केली. रात्री उशिरापर्यंत त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जामीन देण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com