Ponda Municipal Council Election 2023
Ponda Municipal Council Election 2023Dainik Gomantak

Ponda Municipal Council Elections 2023 : फोंड्यात मतदानावेळी किरकोळ बाचाबाची

फोंड्यात 67.97 टक्के मतदान
Published on

फोंडा पालिकेच्या निवडणुकीत किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता तेराही प्रभागांत मतदान शांततेत झाले. सकाळी मतदारांची मोठी गर्दी दिसली; पण नंतर दुपारपर्यंत मतदानाची प्रक्रिया रोडावली, तर संध्याकाळी पुन्हा मतदारांनी थोडीफार गर्दी केलेली दिसली.

सायंकाळी 4 वाजेपर्यंत 67.97 टक्के मतदान झाले होते, तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 75 टक्क्यांपर्यंत मतदान होऊ शकते असा अंदाज आहे. फोंडा पालिकेच्या तेरा प्रभागांसाठी ही निवडणूक झाली आहे.

Ponda Municipal Council Election 2023
Goa Congress : गोव्याबाहेरून टॅक्सी ऑपरेटर आणण्याचा भाजपचा छुपा अजेंडा; अमित पाटकरांचा भाजपावर आरोप

प्रभाग 7 व प्रभाग 13 मध्ये बिनविरोध निवड झाली होती. मतदानाच्या वेळेला भारतीय जनता पक्ष पुरस्कृत फोंडा नागरिक समिती तसेच रायझिंग फोंडा या दोन पॅनेलमध्येच अटीतटीचा सामना होता.

काही ठिकाणी पॅनेलविरहीत स्वतंत्र निवडणुकीत उभे राहिलेल्यांनीही मतदानावेळी आपला दरारा कायम ठेवला आहे, त्यामुळे नेमके कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण बनले आहे. तरीही प्रत्येक उमेदवाराने आपणच निवडून येणार असल्याचा दावा केला आहे.

निवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनीही मतदानावेळी फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेतला. मतदानावेळी काही प्रभागांत संबंधित उमेदवारांच्या समर्थकांनी मतदान बूथजवळ गर्दी केल्याने त्यांना संबंधित निवडणूक अधिकारी व पोलिसांनी हटविले, त्यावेळेला किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले.

Ponda Municipal Council Election 2023
Tourist Assaulted in Goa: महिला सोबती देतो, असे सांगून शिमल्याच्या पर्यटकाला लुटले; नाईटक्लबमध्ये जबर मारहाण

युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा पालिकेच्या या निवडणुकीत युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला. ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रथम प्राधान्य असल्याने त्यांनाही मतदान करणे सोयिस्कर ठरले. युवा मतदारांनी गर्दी केल्याचे दिसले. त्यामुळे बऱ्याच प्रभागांत या मतदारांवरच संबंधित उमेदवारांची भिस्त असल्याचेही जाणवले.

मत विकासालाच...

फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी मतदानानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना फोंडा पालिकेला मतदान म्हणजेच विकासाला मतदान आहे.

मतदार सुज्ञ आहेत, त्यांना विकास म्हणजे काय हे माहीत आहे आणि विकासासाठी सत्तेवर असलेल्या सरकारलाच पाठिंबा देणे योग्य असल्याचे मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळे फोंडा नागरिक समितीचेच उमेदवार निवडून येतील, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com