Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Mapusa Goa: गोव्यात धेंपे आणि नाईक यांच्या प्रचारार्थ अमित शहांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Amit Shah Public Rally In Goa
Amit Shah Public Rally In GoaShah X Handle

Mapusa Goa

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्यात आलेल्या अमित शहांच्या सभास्थळी एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना म्हाशातील आझिलोत दाखल केले असता डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.

बाबुसो उत्तम वेरेकर (वय 63, रा. कुडणे, साखळी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.03) म्हापशातील केटीसी बसस्थानकाजवळ शहांची सभा आयोजित करण्यात आली होती.

बाबुसो म्हापसा येथे अमित शहांच्या सभेसाठी उपस्थित राहिले होते. सभे दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते खाली कोसळले.

बाबुसो कोसळल्यानंतर त्यांना उपस्थित जमावाने 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्यांना आझिलोत दाखल करण्यात आले. पण, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Amit Shah Public Rally In Goa
Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाबुसो यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाबुसो यांना उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com