Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Home Minister Amit Shah: आगामी लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
Home Minister Amit Shah
Home Minister Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. उत्तर गोव्यातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक रिंगणात आहेत तर दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपो आपलं नशीब आजमावत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर आज गोव्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तोफ डागली. म्हापसामधून शाह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या कामांचा लेखाजोखा गोव्याच्या जनतेपुढे मांडला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात झालेल्या विकास कामांची यादीही त्यांनी वाचून दाखवली.

शाह म्हणाले की, ‘’गोवा प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यातील अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे गोव्यात मायनिंग बंद होते. परंतु आम्ही पुन्हा एकदा मायनिंग सुरु केले. त्याचबरोबर येत्या 2 वर्षात गोव्यातील संपूर्ण मायनिंग इंडस्ट्रीज पहिल्याप्रमाणे सुरुळीत चालू होईल. भारतीय जनता पक्ष समस्यांचं निराकरण करणारा पक्ष आहे.’’

Home Minister Amit Shah
Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

शाह पुढे म्हणाले की, ‘’पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने गोव्यातील रस्ते विकासाठी 36 करोड मंजूर केले. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना 37करोड, आरोग्य क्षेत्रासाठी 55 करोड मंजूर केले. याशिवाय, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही राज्यातील जनतेला सुरक्षा कवच प्रदान केले. एकट्या उत्तर गोव्यात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 30 हजार लोकांना लाभ मिळाला आहे.’’

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून हजारो गॅस कनेक्शन देण्याचे काम श्रीपाद नाईक यांनी केले. राज्यातील मत्सव्यसायाला पुन्हा एकदा भरभराट प्राप्त करुन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. एकट्या गोव्यात 13 हजार मच्छिमार बांधवाना बायोमॅट्रिक कार्ड देण्यात आली. त्याचबरोबर 10 हजार मच्छिमार बांधवांना PVC कार्ड देण्यात आले. याशिवाय, राज्याच्या विकासासाठी 108 करोडचे प्रोजेक्ट पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने चालू केले. आम्ही आमच्या जाहीरनाम्यातही मच्छिमार बांधवासाठी अनेक घोषणा केल्या आहेत, असेही शाह यांनी नमूद केले.

Home Minister Amit Shah
Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

शाह शेवटी म्हणाले की, ‘’देशात 10 वर्ष काँग्रेसप्रणित सरकार होते आणि आता 10 वर्ष मोदींचे सरकार आहे. मी काँग्रेसच्या नेत्यांनी विचारतो की, गोव्यासाठी केंद्राकडून किती विकासनिधी आला? ते सांगू शकणार नाहीत. मी सांगतो, काँग्रेसच्या शासनकाळात 6300 करोड गोव्यासाठी देण्यात आले होते. तर मोदींनी 35 हजार 27 करोड गोव्यासाठी विकासनिधी दिला. त्याचबरोबर 11 हजार करोड केवळ गोव्याच्या पायाभूत विकासासाठी दिले.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com