धक्कादायक! वडिलानेच केला 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

दक्षिण गोव्यातून (South Goa) आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Goa Rape Case
Goa Rape CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सध्या राज्यात महिला आणि मुलींवर लैंगिक (Rape Case) अत्याचाराच्या घटना वाढत असून त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. काही घटना ताज्या असतानाच दक्षिण गोव्यातून (South Goa) आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका नराधम वडिलाने स्वतःच्याच 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Goa Rape Case
Goa Murder Case: पोलिसांकडून लपवाछपवी, पुरावेही नष्ट

गेल्या जुलै महिन्यापासून हा प्रकार चालू झाला होता. ही मुलगी आई वडिलाबरोबर झोपली होती. तेव्हा बापाने हे कृत्य केले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला डॉक्टरला दाखवण्यास नेले होते तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस तक्रार केल्यानंतर काल रात्री संशयिताला अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या मुलीची तपासणी करण्यात आली असून अहवाल मिळालेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. अहवाल आल्यावर कडक कलमाखाली गुन्हा नोंद केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com