IFFI : 54 वा ‘इफ्फी’ प्रत्येकाला आपलासा वाटावा ! अंकिता शर्मा

IFFI : सिने मेला, कारावान्स, शिगमोत्सव, कार्निव्हल, सेल्फी पॉइंट उपक्रमांचे आयोजन
 CEO of Entertainment Society Ankita Sharma
CEO of Entertainment Society Ankita SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

IFFI : पणजी, ५४ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’ ची तयारी अंतिम टप्प्यात असून महोत्सवासाठी अवघा एक आठवडा बाकी आहे. हा ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय असला तरी तो सामान्य गोवेकरांना आपलासा वाटावा, यासाठी आमचे प्रयत्न असून असे ‘इफ्फी’ सिने मेला, ओपन एअर स्क्रीनिंग, कारावान्स, शिगमोत्सव , कार्निवल, सेल्फी पॉइंट या उपक्रमांचे आयोजन केले आहे.

ज्यात सामान्य नागरिक सहभागी होऊ शकतील, अशी माहिती मनोरंजन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता शर्मा यांनी दिली.‘इफ्फी’ तयारीच्या पार्श्वभूमीवर त्या‘गोमन्तक’ शी बोलत होत्या.

 CEO of Entertainment Society Ankita Sharma
Goa Drug Case: 15 कोटींचे कोकेन जप्‍त

शर्मा म्हणाल्या,की ‘इफ्फी’ देशाच्या दृष्टीने सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वय समितीमार्फत महोत्सव अधिक अधिक चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा महोत्सव केवळ प्रतिनिधी किंवा सेलिब्रिटी पुरता राहू नये. यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.

चित्रपटांतून सांस्कृतिक दर्शन

‘इफ्फी’ दरम्यान ५ दिवस चित्रपटांच्या माध्यमातून स्थानिक सांस्कृतिकतेचे दर्शन होईल. २२ रोजी पूर्व भागातील बंगाली, ओरिया, असामी, मनिपुरी, आणि उत्तरांचल भागातील चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

२३ रोजी दक्षिणेतील तमिळ आणि मल्याळम चित्रपट दाखवले जातील. २४ रोजी उत्तरेतील पंजाबी, डोगरी, भोजपुरी, राजस्थानी, उर्दू आणि छत्तीसगढी चित्रपट आपल्या राज्याचे सांस्कृतिक दर्शन घडवतील.२५ रोजी कोकणी, मराठी आणि गुजरातीतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट प्रदर्शन होईल. २६ रोजी कन्नड आणि तेलगु चित्रपट बघता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com