Goa News: चिंताजनक! राज्यात ५ हजार महिला वेश्या व्यवसायात

ARZ: आर्थिक पुनर्वसन केंद्राची गरज; वाढत्या पर्यटनासोबत समस्याही गंभीर
ARZ: आर्थिक पुनर्वसन केंद्राची गरज; वाढत्या पर्यटनासोबत समस्याही गंभीर
Arun PandeyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा हे वेश्या व्यवसायातील एक प्रमुख केंद्र बनत आहे. गोवा राज्य एड्स कंट्रोल सोसायटी आकडेवारीनुसार गोव्यात सुमारे ५ हजार महिला या व्यवसायात आहेत. ज्या महिला या व्यवसायात आहेत त्यांच्या कुटुंबात काही ना काही समस्या असल्याचे दिसून आल्याचे अर्ज संस्थेचे अरुण पांडे यांनी सांगितले. संस्कृती भवन पाटो येथे तस्करी विरोधीदिन कार्यक्रमावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पांडे म्हणाले, गोव्यातील ज्या महिला वेश्या व्यवसायात आहेत, त्यातील कुटुंबातील पुरुष हे मद्यपी किंवा कामाला न जाता घरी राहणारे आहेत, कुटुंबाचे उत्पन्नाचे योग्य साधन नाही, कर्ज आहे. अशा अनेक समस्या असणाऱ्या कुटुंबातील मुली-महिला या व्यवसायात आहेत. याला कुठेतरी आळा घालणे गरजेचे आहे, अन्यथा गोव्याला भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतील.

देशातील २८ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश, युगांडा, केनिया येथील मुलींना या व्यवसायासाठी आणले जाते. गोव्यात वेश्या व्यवसायाला मागणी वाढली आहे. देशी पर्यटकांकडून ही मागणी अधिक आहे. त्यामुळे गोरगरीब समाजातील मुली या व्यवसायात आणल्या जातात.

आम्ही म्हापसा, कळंगुट या ठिकाणी जागा मिळाल्यास तेथे लैंगिक तस्करीतून सोडविलेल्या महिलांना रोजगारासाठीचे केंद्र सुरू करू इच्छित आहे. त्यासाठी आम्हाला सरकारच्या मदतीची गरज असल्याचे अरुण पांडे यांनी सांगितले.

३२०० महिलांना रोजगार

अर्ज संस्थेद्वारे वेश्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या महिलांना रोजगारही दिला जातो. महिना पंधरा हजार वेतन, ईएसआय, पीएफ तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही करतो. जर अशा महिला असतील, तर त्यांनी तसेच संस्थांनी आम्हाला कळवावे, आम्ही त्यांना रोजगार देऊ. आम्ही आत्तापर्यंत सुमारे ३२०० महिलांना रोजगार दिल्याचे अरुण पांडे म्हणाले.

ARZ: आर्थिक पुनर्वसन केंद्राची गरज; वाढत्या पर्यटनासोबत समस्याही गंभीर
Goa News: वेश्‍‍या पुनर्वसन योजना कागदावरच, नुकसान भरपाईबाबत शासन उदासीन

तस्करी रोखण्यासाठी धोरण हवे

राज्यातील पोलिस यंत्रणा, महिला व बालकल्याण संचालनालय, महिला आयोग व इतर संघटनांनी एकत्र येत तसेच यात मुख्य भूमिका सरकारने घेतली, तर वेश्या व्यवसाय तसेच तस्करीला आळा घालणे शक्य आहे. यासंबंधी सरकारने धोरण आखणे गरजेचे असल्याचे अरुण पांडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com