Goa News: वेश्‍‍या पुनर्वसन योजना कागदावरच, नुकसान भरपाईबाबत शासन उदासीन

Goa News: ‘अर्ज’चा दावा : गेल्‍या दहा वर्षांत एकाही पीडितेला मिळाली नाही नुकसान भरपाई
Prostitution
ProstitutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: वेश्‍‍याव्‍यवसायातील महिलांना त्‍या व्‍यवसायातून बाहेर काढून त्‍यांचे पुनर्वसन करण्‍यासाठी सरकारच्‍या अनेक योजना असल्‍या तरी त्‍या फक्‍त कागदावरच आहेत, अशी शंका येते.

या पीडितांना एक लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळावी यासाठी दहा वर्षांपूर्वी कायदा संमत झाला होता. मात्र मागच्‍या दहा वर्षांत एकाही पीडितेला या योजनेखाली नुकसान भरपाई मिळालेली नाही.

वेश्‍‍याव्‍यवसायातील महिलांचे पुनर्वसन करण्‍यासाठी मागची 25 वर्षे कार्यरत असलेल्‍या ‘अर्ज’ या संघटनेचे निमंत्रक अरुण पांडे यांच्‍याशी चर्चा केली असता वरील माहिती पुढे आली.

Prostitution
Goa Police : समाजकंटकांकडून दिशाभूल ; जनतेने सावध रहावे : जसपाल सिंग

पांडे म्‍हणाले, फक्‍त वेश्‍‍याव्‍यवसायातीलच महिलांना नव्‍हे तर लैंगिक अत्‍याचाराला बळी पडलेल्‍या कोणत्‍याही पीडितेला या योजनेखाली एक लाखापर्यंतची नुकसान भरपाई मिळण्‍याची तरतूद आहे.

यासाठी जिल्‍हा न्‍यायीक प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. मात्र ही नुकसान भरपाई मिळविण्‍यासाठी संपर्क केला तर ती नेमकी कशी मिळवावी याची कुठलीही माहिती उपलब्‍ध होत नाही आणि अर्जही उपलब्‍ध नसतात असे त्‍यांनी सांगितले.

‘अर्ज’ या संघटनेने आपला नुकताच रौप्‍यमहोत्‍सव साजरा केला. या संघटनेने मागच्‍या 25वर्षांत वेश्‍‍याव्‍यवसायात गुंतलेल्‍या किमान 2800 महिलांचे पुनर्वसन केले आहे.

या पार्श्वभूमीवर गोवा सरकारच्‍या पातळीवर होणारे पुनर्वसनाचे कार्य केवळ ‘संथ’ या व्‍याख्‍येत बसणारे आहे. या पीडितांचे पुनर्वसन करण्‍यासाठी 2013 साली गोवा सरकारने ‘प्रभात’ नावाची योजना सुरू केली होती.

सदर योजनेअंतर्गत या पीडितांना सुरूवातीला तात्‍काळ स्‍टायपँड देण्‍याबरोबरच त्‍यांना कामाचे प्रशिक्षण देऊन नंतर नोकरी मिळवून देणे किंवा स्‍वत:चा व्‍यवसाय स्‍थापण्‍यासाठी कर्ज उपलब्‍ध करून देणे अशा सोयी आहेत.

मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी सहा महिने ते एक वर्ष एवढा कालावधी जात असल्‍यामुळे या योजनेचा फायदा घेण्‍यासाठी सहसा कुणीही पुढे येत नसल्‍याचे समोर आले आहे.

‘अर्ज’ने दिले 700 ते 800 पीडित महिलांना काम

वेश्‍‍याव्‍यवसायातील महिलांचे पुनर्वसन करण्‍यासाठी मागच्‍या 25 वर्षांत ‘अर्ज’ने जो पॅटर्न वापरलाय, तो एकदम सुटसुटीत आहे. त्‍यात प्रशिक्षण आणि रोजगार या दोन्‍ही स्‍तरावर काम केले जाते.

या महिलांना रोजगार मिळावा यासाठी संस्‍थेने स्‍वत:ची लाँड्री, पेपर बॅग्‍स्‌‌ तयार करण्‍याचा कारखाना, रि-सायकलेबल वस्‍तू तयार करण्‍याचे युनिट सुरू केले आहे. शिवाय ही संस्‍था या महिलांना दुसरीकडेही काम मिळवून देण्‍याचे कार्य करते.

याबाबत पांडे म्‍हणाले, आम्‍ही या महिलांना आमच्‍या कारखान्‍यांत काम देण्‍याबरोबरच त्‍यांच्‍यातील कौशल्‍य वाढविण्‍याच्‍या कामावर भर देतो. या महिलांमध्‍ये स्‍वत:च्‍या पायावर आपण उभे राहू शकतो हा विश्‍‍वास निर्माण झाल्‍यानंतर त्‍यांना वेगवेगळ्‍या ठिकाणी कामाला पाठविले जाते.

आतापर्यंत अशा 700 ते 800 महिलांना या माध्‍यमांतून काम मिळाले आहे. ज्‍या महिला थोड्या फार शिकल्‍या आहेत, त्‍यांच्‍यासाठी चारचाकी चालविणे, ब्‍युटीपार्लर अशाप्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

या प्रशिक्षणात चांगली कामगिरी केलेल्‍या महिलांना फाईव्‍ह स्‍टार किंवा सेव्‍हन स्‍टार हॉटेल्‍समध्‍ये काम मिळते. आतापर्यंत किमान 75 ते 80 महिलांना असे काम मिळाले असून त्‍या आपापल्‍या व्‍यवसायात स्‍थिरस्‍थावर झालेल्‍या आहेत.

Prostitution
Banastarim Bridge Accident : परेशचा वाहन परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com