IFFI Goa: इफ्फीसाठी तब्बल 5,000 सिनेरसिकांनी केली नोंदणी; दिव्यांगांसाठीही कार्यशाळा

लोकप्रिय 8 फ्रेंच चित्रपटांची असणार मेजवानी
53th IFFI
53th IFFIDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यासह जगभरातील सिनेरसिक ज्या महोत्सवाच्या प्रतिक्षेत असतात. तो भारताचा 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी तब्बल 5,000 प्रतिनिधींनी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

(5,000 delegates have registered for the 53rd International Film Festival )

मिळालेल्या माहितीनुसार भारताचा 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसासाठी तब्बल 5,000 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यात लोकप्रिय 8 फ्रेंच चित्रपटांच्या प्रदर्शनांसह फ्रान्स हा केंद्रस्थानी असेल त्यामुळे यंदा फ्रान्स नागरिकांचा ही विशेष सहभाग असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

53th IFFI
Goa IFFI 53: आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दृश्यम 2' चे होणार स्पेशल स्क्रीनिंग, सिंघम लावणार हजेरी

या महोत्सवामध्ये ऑस्ट्रियन चित्रपट अल्मा आणि ऑस्कर हा ओपनिंग चित्रपट असेल, तर पोलिश चित्रपट परफेक्ट नंबर हा शेवटचा चित्रपट असणार आहे. तर जर्मन चित्रपट फिक्सेशन मिड-फेस्ट चित्रपट ही या महोत्सवाचा भाग असेल. तसेच स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक कार्लोस सौरा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

53th IFFI
Curfew Order During IFFI 2022: इफ्फीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू; जमावबंदीसह गोव्यात आणखी कोणते निर्बंध वाचा सविस्तर

या महोत्सवात देशभरातील अर्जांमधून निवडलेल्या 75 सर्जनशील संकल्पनांचा या महोत्सवात गौरव होणार आहे. या महोत्सहामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी अभिनय आणि चित्रपट निर्मिती या विषयावरील कार्यशाळा आयोजित केले जाणार आहे. त्यामूळे हा महोत्सव म्हणजे दिव्यांगांसह सिनेरसिकांसाठी आनंदाची पर्वणी असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com