37th National Sports Competition: संदीप हेबळे गोव्याचे ‘चेफ द मिशन’; गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे नियुक्ती

स्पर्धा राज्यातील क्रीडा उत्कृष्टतेला चालना देईल : संदीप हेबळे
Sandeep Heble
Sandeep HebleDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Sports Competition: गोव्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी यजमान संघाचे ‘चेफ द मिशन’ म्हणून संदीप हेबळे यांची गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे (जीओए) नियुक्ती करण्यात आली.

‘‘37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्याचा चेफ द मिशन म्हणून निवड झाल्याबद्दल मी आनंदित आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यात होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची आपले खेळाडू आतुरतेने वाट पाहत आहेत."

गोवा ऑलिंपिक असोसिएशनने माझ्यावर विश्वास दाखविला हा माझा मोठा सन्मान वाटतो. स्पर्धेद्वारे गोव्यात कायमस्वरूपी क्रीडा वारसा स्थापित करताना ही मोठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू."

"ही स्पर्धा राज्यातील क्रीडा उत्कृष्टतेला चालना देईल, वारसा निर्माण करेल आणि गोव्यासाठी मोठा विजय मिळवून देणारी ठरेल,’’ असे हेबळे यांनी ‘चेफ द मिशन’पदी नियुक्त झाल्यानंतर सांगितले.

Sandeep Heble
डच खासदाराच्या हत्येचा आरोप, पाकिस्तानी क्रिकेटपटूला नेदरलँडमध्ये 12 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

जीओए अध्यक्ष, सचिव, समिती सदस्य, राज्य क्रीडा संघटना, गोवा क्रीडा प्राधिकरणाचेही हेबळे यांनी आभार मानले.

गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 25 अथवा 26 ऑक्टोबरला उद्‍घाटन होईल आणि नऊ नोव्हेंबर रोजी समारोप होईल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ४३ खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या ऑलिंपिक संघटनांना १० सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्पर्धेसाठी ‘चेफ द मिशन’ नियुक्त करण्यास सांगितले होते.

Sandeep Heble
FC Goa: एफसी गोवा संघाच्या नेतृत्वात बदल; नंदन पिरामल नवे अध्यक्ष

राज्यातील अनुभवी क्रीडा प्रशासक

संदीप हेबळे सध्या गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिवपदी कार्यरत आहेत. ते भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या वय फसवणूक समितीचे सदस्यही आहेत.

याशिवाय गोवा बास्केटबॉल संघटना व तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सदस्य, गोवा ऑलिंपिक संघटना व गोवा टेबल टेनिस संघटनेचे प्रसिद्धी माध्यम समन्वयक या नात्याने ते सक्रिय आहेत.

याशिवाय गोवा आरटीआय संघटनेचे ते संयुक्त सचिवही आहेत. हेबळे यांनी गोव्यात झालेल्या विविध राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा, राष्ट्रीय पिकलबॉल मानांकन स्पर्धेत आयोजन सचिव म्हणूनही यशस्वी योगदान दिलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com