Goa Crime News: सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण! ऑपरेशन 'सुरक्षा'अंतर्गत 5 जणांना अटक

सायबरस्पेसच्या सक्रिय निरीक्षणावर आधारित, बाल लैंगिक शोषण सामग्री (CSAM) चे प्रसारण आणि साठवण होत असल्याचे अनेक प्रकार पोलिसांसमोर उघडकीस आले.
Goa Crime News | Operation Suraksha
Goa Crime News | Operation SurakshaDainik Gomantak
Published on
Updated on

Operation Suraksha: गोव्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमीच सतर्क असते. यामध्ये प्रामुख्याने सायबर गुन्ह्यांचा जास्त समावेश आहे. सायबरस्पेसच्या सक्रिय निरीक्षणावर आधारित, बाल लैंगिक शोषण सामग्री (CSAM) चे प्रसारण आणि साठवण होत असल्याचे अनेक प्रकार पोलिसांसमोर उघडकीस आले.

त्यानुसार, पोलिस प्रशासन युनिट्सच्या संयुक्त पथकांनी उत्तर आणि दक्षिण गोव्यात छापे टाकले आणि CSAMशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पाच जणांना अटक केली आहे.

Goa Crime News | Operation Suraksha
Goa Monsoon 2023: खांडेपार - उसगाव मार्गावर दरड कोसळण्याचा धोका; दुचाकीस्वार धास्तावले

सलमान खान (20, चिंबल, मूळ-मध्य प्रदेश), महेंद्रसिंग (27, बेती, मूळ-यूपी), लेमन इस्लाम (24, कळंगुट, मूळ-पश्चिम बंगाल), प्रणित वळवईकर (24, दवर्ली) आणि नितीन रेडकर (23, कळंगुट, मूळ-सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सायबर क्राइम टीम, गुन्हे शाखेचे पथक, उत्तर गोवा जिल्हा पोलीस आणि दक्षिण गोवा जिल्हा पोलीस यांनी एकत्रितपणे सायबर स्पेसचे काटेकोरपणे निरीक्षण केले आणि यामध्ये दोषी असलेल्यांना पकडत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

CSAM हा एक घृणास्पद प्रकार आहे ज्यामध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण केले जाते. हे बेकायदेशीर असून नैतिकदृष्ट्या निंदनीय आहे. CSAM चे वितरण, ताबा किंवा निर्मिती हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे.

याबाबत पोलिसांनी सर्व नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, मुलांचे शोषण होणार नाही याची खात्री करण्यासाठी अशा CSAM सामग्रीचे सर्व प्रकारचे प्रसारण टाळण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com