Goa Monsoon 2023: केरये - खांडेपार ते उसगावपर्यंतचा मार्ग धोकादायक स्थितीत असून या मार्गावर कायम अपघातांचे सत्र तर सुरूच आहेच, पण चौपदरी रस्ता कामात योग्य खबरदारी घेतली नसल्याने रस्त्याच्या कडा कोसळण्याच्या मार्गावर आहेत.
केरये येथील उतरणीवर तर एक भला मोठा दगड आठ दिवसांपूर्वी खाली कोसळला होता, आता त्याच ठिकाणी मोठी दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत घेऊन जावे लागते. कधी दरड कोसळले हे सांगता येत नाही.
राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतूक सुरू असते. अचानक दरड कोसळल्यास बाका प्रसंग उद्भवू शकतो.
काणकोणात नदी,नाले तुडुंब -
काणकोणात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कायम असून झाडांची पडझडही सुरु आहे. आज रोजी सकाळच्या सत्रात येथील सर्वच नद्या-नाले ओसंडून वाहत होते.
पावसाची सद्या शतकाकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत ९६ इंच इतका पाऊस काणकोणात झाला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
आज (बुधवार) पहाटे 4.45 च्या दरम्यान रस्त्यावर कोळंब येथे माड कोसळला. कोळंब येथेच सकाळी 8.30 च्या सुमारास एकाच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.
दुमाणे, आगोंद पुलाजवळ झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.