
Christmas Celebration in Goa: गोव्यावर जवळपास साडेचारशे वर्षे पोर्तुगीज अंमल होता. त्यामुळे पोर्तुगीज संस्कृती आणि ख्रिसमसचा उत्साह गोव्यातही दिसून येतो. गोव्यातील विविध चर्चेसना आत्तापासून झळाळी मिळू लागली आहे. ख्रिसमससाठी बाजारपेठाही सजल्या आहेत.
अनेक पर्यटक गोव्यात ख्रिसमसकाळात येत असतात. त्यामुळे गोव्यातील काही ठिकाणांवर ख्रिसमसचा मोठा उत्साह दिसून येतो. कोणती आहेत ही ठिकाणे याविषयी...
हणजुणे बीच (Anjuna)
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी गोव्याला जात असाल तर हणजुणे बीचला भेट द्यायला विसरू नका. कारण ख्रिसमसदिवशी हा बीच एखाद्या नवरीसारखा नटलेला असतो. रात्री या बीचवर जोरात पार्टी सुरू असते. समुद्र, सफेद वाळू आणि रात्रीचा आसमंत असे वातावरण या वेळी येथे असते.
हरमल बीच (Arambol)
ख्रिसमसनिमित्त गोव्यातील हरमल बीचदेखील पूर्ण सजलेला असतो. या बीचवर बहुतांश करून परदेशी पर्यटक येत असतात. ख्रिसमसदिवशी हरमल बीचवर जाण्याची संधी मिळाली तर अजिबात मिस करू नका.
हरमल गोव्यातील सुंदर बीचपैकी एक असून नाईटलाईफ आणि पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मोरजी बीच (Morjim)
गोव्यात ख्रिसमस पार्टी करण्यासाठी मोरजी बीच ही एक मस्त जागा आहे. मोरजी बीच त्याच्या सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी येथे जरूर जावे.
येथे संध्याकाळ झाली की पार्टीला सुरवात होते आणि ती पहाटेपर्यत सुरू असते. मोरजी हा एक शांत समुद्रकिनारा आहे.
कांदोळी बीच (Candolim)
कुटूंबासह ख्रिसमस साजरा करायचा असेल तर कांदोळी बीच ही उत्तम जागा आहे. ही जागा लहान मुलांसाठी उत्तम मानली जाते. येथे तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी अनेक जागा आहेत.
तसेच येथे अनेक रेस्टॉरंट्सही आहेत. कांदोळी बीचवर लहान मुलांचा बर्थडे सेलिब्रेशन करण्याचीही सोय आहे.
पाळोले बीच (Palolem)
पाळोले बीचवर ख्रिसमसची पार्टी रात्रभर सुरू असते. येथे परदेशी पर्यटकही येत असतात. पाळोले बीच हा एक अर्धगोलाकार आकाराचा किनारा आहे. याची लांबी सुमारे एक किलोमीटर आणि 61 मीटर इतकी आहे. येथील वाळूही सफेद आहे.
येथील सूर्यास्त पाहण्यासारखा असतो. हा गोव्यातील सर्वात सुंदर बीचपैकी एक आहे. येथे ख्रिसमस सेलिब्रेट करणे अविस्मरणीय अनुभव असू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.