World Record: 45 देशातील नागरिकांनी एकत्र खेळले Spin the Wheel; गोव्यातील कॅसिनोचा जागतिक विक्रम

Deltin Royale: गोव्यात ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी अमेजिंग गोवा ग्लोबल बिझनेस समीट पार पडली
World Record: 45 देशातील नागरिकांनी एकत्र खेळले Spin the Wheel; गोव्यातील कॅसिनोचा जागतिक विक्रम
Deltin Royale
Published on
Updated on

Deltin Royale World Record

पणजी : गोव्यातील एका कॅसिनोने जागतिक विक्रम केला आहे. ४५ देशातील नागरिकांनी एकत्र येत स्पीन द व्हिल नावाचा गेम खेळत हा विक्रम नोंदवला आहे. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्लोबल बिझनेस समीटसाठी विविध देशातील नागरिकांनी हजेरी लावली होती.

यावेळी गोव्याच्या कला संस्कृती, मोरंजन आणि पर्यटन अशा गोष्टींचा आढावा घेताना विविध देशाच्या प्रतिनिधी यांनी कॅसिनोला भेट दिली.

गोव्यात ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी अमेजिंग गोवा ग्लोबल बिझनेस समीट पार पडली. यात विविध देशाच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. गोव्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा आढावा घेताना प्रतिनिधींनी डेल्टिन रॉयाल कॅसिनोला भेट दिली.

यावेळी ४५ देशातील नागरिकांनी स्पीन द व्हिल या गेममध्ये सहभाग घेतला. याची ग्लोडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Golden book of world records) नोंद करण्यात आली आहे. Deltin गोव्यात पार पडलेल्या समीटचा मनोरंजन पार्टनर होता.

World Record: 45 देशातील नागरिकांनी एकत्र खेळले Spin the Wheel; गोव्यातील कॅसिनोचा जागतिक विक्रम
Bitcoin Price: ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी; बिटकॉइनच्या किमतीत 12 टक्के वाढ

“४५ देशातील प्रतिनिधींना एकत्र आणून मोठ्या गेममध्ये सहभागी करुन घेतले. डेल्टिनने नोंदवलेल्या वर्ल्ड रेकॉर्डबाबत आम्हाला आनंद होत आहे. विविध क्षेत्रातील लोकांना मनोरंजन, संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा हा प्रयत्न होता”, असे डेल्टा कॉर्पचे प्रमुख मनोज जैन म्हणाले.

एकता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे डेल्टा कॉर्पचे मार्केटींग प्रमुख अरिंदम बसू म्हणाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेल्टीन आणि व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनचे आम्ही अभिनंदन करतो. या प्रकारचा जागतिक विक्रम खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी आहे. डेल्टिन रॉयल हा विक्रम बराच काळ टिकवून ठेवेल, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आशिया प्रमुख डॉ. मनीष विश्नोई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com