Bitcoin Price: ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी; बिटकॉइनच्या किमतीत 12 टक्के वाढ

Bitcoin Price: बिटकॉईनचा दर सध्या ८९,१७४ डॉलर्सवर पोहोचली होती. बिटकॉइनच्या किंमतीने हा उच्चांक गाठला आहे.
ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी; Bitcoin च्या किमतीत 12 टक्के वाढ
BitcoinDainik Gomantak
Published on
Updated on

Bitcoin Price

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी सुरुच असून सोमवारी (11 नोव्हेंबर) बिटकॉइनने पुन्हा उच्चांक गाठला.

Coin Metrics च्या माहितीनुसार, सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणजेच बिटकॉइनच्या किंमतीत १२% पेक्षा जास्त वाढ झालीये. बिटकॉईनचा दर सध्या ८९,१७४ डॉलर्सवर पोहोचली होती. बिटकॉइनच्या किंमतीने हा उच्चांक गाठला आहे.

इथेरियमची किंमतही ७% ने वाढून ३,३७१.७९ डॉलर्स ऐवढी झाली असून, मागील आठवड्यात तब्बल ३०% वाढ झाल्याने इथेरियमच्या किंमतीनेही तीन हजार डॉलर्सचा आकडा ओलांडला आहे.

बिटकॉईनमध्ये ट्रम्प यांच्या विजयानंतर ३० टक्के वाढ झालीय. डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत अमिरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्विकारली आहेत.

क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात असणाऱ्या ट्रम्प यांनी त्यांची भूमिक बदलत डिजिटल करन्सीसाठी अनुकूल नियम लागू करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या अजेंड्यामध्ये यूएस बिटकॉइन रिझर्व्ह तयार करणे आणि देशांतर्गत क्रिप्टो मायनिंग वाढवणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, मावळते राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या नेतृत्वाखाली यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. यामुळे डिजिटल असेटचे पुनरुज्जीवन झालंय, असा सूर मार्केटमध्ये आहे. CoinGecko च्या अहवालानुसार, आता क्रिप्टो करन्सीचे एकत्रित मूल्य सुमारे $3.1 ट्रिलियन आहे.

मोठ्या बिटकॉइन होल्डिंग असलेल्या कंपन्या दुप्पट होत आहेत. एक प्रमुख कॉर्पोरेट गुंतवणूकदार असणाऱ्या मायक्रोस्ट्रॅटेजी या कंपनीने 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान सुमारे $2 अब्ज डॉलर्समध्ये 27,200 बिटकॉइन खरेदी केले आहेत.

स्टॉक मार्केट आणि सोन्यासारख्या पारंपारिक गुंतवणूक पर्यायांना मागे टाकत 2024 मध्ये Bitcoin चे मूल्य दुप्पट झाले आहे. समर्पित यू.एस. बिटकॉइन ईटीएफ लाँच केल्याने आणि फेडरल रिझर्व्हने दर कपात केल्याने बिटकॉइनला चालना मिळाली आहे.

तसेच, अमेरिका निवडणूक प्रचारादरम्यान क्रिप्टो कंपन्यांनी ट्रम्प आणि प्रो-क्रिप्टो उमेदवारांना जोरदार पाठिंबा दिला होता.

'ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टो मार्केटमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अमेरिका जागतिक क्रिप्टो कॅपिटल म्हणून उदयास येत आहे. बिटकॉइनसाठी देशात पोषक वातावरण निर्माण होईल याबाबत जाणकार सकारात्मक आहेत', असे मत एक क्रिप्टो मार्केटच्या तज्ञ व्यक्तीने CNBC कडे मांडले.

तर, तज्ञांनी वर्षाअखेरपर्यंत क्रिप्टो करन्सीत वाढ होत राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com