Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

Viral Video: देशात आता फुटपाथवर देखील टोल आकारला जाणार असल्याची टीका नेटकरी करत आहेत. याच ट्रोल शृंकलेतील हा व्हिडिओ आहे.
Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले
Funny Viral Video
Published on
Updated on

Funny Viral Video

मुंबई: एकदातरी गोव्याला भेट द्यावी असे अनेकांना वाटत असते. निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारे, संस्कृती आणि पारंपरिक सण- उत्सवाचा जल्लोष अनुभवण्यासाठी पर्यटक गोव्यात येत असतात. पर्यटनासाठी गोव्याला जाण्याची अनेकांची इच्छा पैशांच्या कमतरतेमुळे पूर्ण होत नाही.

दरम्यान, प्रवासात भराव्या लागणाऱ्या टोलमुळे चार मित्रांचे गोवा ट्रीपचे स्वप्न कसे भंगले. याचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

देशातील महामर्गावर आकारल्या जाणाऱ्या टोल प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे. देशात आता फुटपाथवर देखील टोल आकारला जाणार असल्याची टीका नेटकरी करत आहेत. याच ट्रोल शृंकलेतील हा व्हिडिओ आहे.

मुंबईतील चार Engineer मित्रांचे गोव्याचे जाण्याचे स्वप्न असते. कंपनीत काम करुन ते पैसे गोळा करतात. मात्र रस्त्याने गोवा ट्रीपला जात असताना टोल भरण्यातच त्यांचे पैसे संपतात व माघारी येण्यासाठी बसचे बुकींग करत आहेत, असे या व्हिडिओत म्हटले आहे.

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले
Goa-Maharashtra Coastline Security: सागरी सुरक्षेसाठी...! गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दलाचा सराव

मंत्री गडकरींनी रस्त्यावर एवढ्या ठिकाणी टोल उभारले आहेत की टोल भरण्यात आमचे पैसे संपले. गडकरी ज्या गतीने चालले आहेत ते पाहता येत्या काही दिवसांत फुटपाथवर देखील टोल आकारणी सुरु होईल, अशी प्रहसंनात्मक टीका या व्हिडिओतून करण्यात आली आहे.

द फॉक्सी हिंदी नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. हे चॅनलवर काल्पनिक वृत्त (शक्यतो प्रहसंनात्मक) प्रसिद्ध केली जातात. मनोरंजनाच्या उद्देशाने असे व्हिडिओ ते करत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com