बुडालेल्‍या बार्जवरील चौघे अजूनही बेपत्ताच

श्रीकृष्णा बार्जवरील चार कामगारांचा अद्याप शोध न लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली चिंता
4 man on barge heading to Goa from Jaigad port are still missing
4 man on barge heading to Goa from Jaigad port are still missingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: गेल्या गुरुवारी बुडालेल्या श्रीकृष्णा बार्जवरील चार कामगारांचा अद्याप शोध न लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली आहे. आठ-नऊ दिवस झाल्याने ते जीवित नसतील यासंबंधी आम्ही मन घट्ट केले आहे.

4 man on barge heading to Goa from Jaigad port are still missing
रावणफोंड येथे जिन्यावरून पडल्‍याने महिलेचा दुर्दैवी मृत्‍यू

त्यामुळे निदान त्यांच्या मृतदेहांचा शोध तरी घ्यावा, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. ही बार्ज दहा कामगारांसह जयगडहून गोव्याकडे निघाली होती. त्या रात्री समुद्रात तुफान आल्याने बार्ज खोल समुद्रात बुडाली. याप्रकरणी माहिती मिळताच तटरक्षक दलातर्फे त्वरित शोधमोहीम हाती घेऊन पाचजणांना वाचवण्‍ायात आले होते.

जयगड बंदरातून गोव्याकडे जाणारी एक बार्ज दुर्दैवाने समुद्रात कोसळल्याने एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला गेल्या आठवड्यात मृत्यू झाला आणि पाच बचावले होते. त्यापैकी चार क्रू मेंबर्स अजूनही बेपत्ता आहेत. गोवा तटरक्षक दलाचे अधिकारी अजूनही बचाव मोहीम राबवत आहेत.

4 man on barge heading to Goa from Jaigad port are still missing
संस्कृती खात्याच्या निवडप्रकीयेत वशिलेबाजी!

जयगडहून गोव्यासाठी निघालेल्या दहा कर्मचाऱ्यांसह श्री कृष्णा ही बार्ज गुरुवारी बेपत्ता झाली. कोस्ट गार्ड गोवा डीआयजी ए बोस यांनी दिलेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाने, घटनेची माहिती मिळताच, बचावकार्यासाठी वेगवेगळे पथके रवाना करण्यात आले. तटरक्षक दलाने ताबडतोब त्यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) चेतक आणि तीन जहाजे बचाव आणि शोध मोहिमेसाठी कार्यरत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com