37th National Sports Competition: ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे’च्या आयोजनासाठी कंत्राटदार; देकार मागवले

प्रत्यक्षातील सामन्यांची जबाबदारी सरकारवर
37th National Sports Competition
37th National Sports CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Sports Competition: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रत्यक्षातील सामने वगळता इतर आयोजनाची जबाबदारी सरकार कंत्राटी पद्धतीने देणार आहे. राहण्याची व्यवस्था, वाहतूक आणि खानपान सेवेचे कंत्राट देण्यासाठी ई-पद्घतीने देकार मागवण्यात आले आहेत.

इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी यासाठी देकार द्यावेत, असे निविदा सूचनेत नमूद करण्यात आले आहे. यामुळे या स्पर्धेचे आयोजनही गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून नव्हे तर प्राधिकरणाच्या माध्यमातून; पण कंत्राटदाराकरवी केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, निवास व्यवस्था आणि खानपान सेवा व्यवस्थापित करणे आणि वाहतूक लॉजिस्टिक हाताळणे यामध्ये उत्तम अनुभव असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी या प्रकल्पासाठी बोली लावण्यास पात्र आहेत.

37th National Sports Competition
Ganesh Chaturthi 2023: यंदा सरपंचांसह पंचांची चतुर्थी मानधनाविनाच!

क्लिष्ट इव्हेंट ऑपरेशन्स अमलात आणण्यासाठी, उच्च दर्जाचे आदरातीथ्य सुनिश्चित करण्यासाठी आणि निवास, खानपान आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंमध्ये समन्वय साधण्यासाठी बोलीदारांनी त्यांची क्षमता प्रदर्शित करणे महत्त्वपूर्ण आहे. गोव्याच्या क्रीडा प्राधिकरणाने निश्चित केलेल्या कठोर आवश्यकता आणि मानकांची पूर्तता करणाऱ्या अनुभवी एजन्सींसाठी बोली प्रक्रिया खुली आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

पात्र बोलीदारांनी कुजिरा, बांबोळी येथे त्यांचा दृष्टिकोन, कार्यपद्धती, संघ रचना आणि उपक्रम यावर तांत्रिक सादरीकरण करणे आवश्यक आहे. आर्थिक देकार उघडण्याची तारीख अद्याप ठरलेली नाही, ती शुध्दीकरण पत्राद्वारे कळवली जाईल, जी ई-प्रोक्योरमेंट पोर्टलवर अपलोड केली जाईल, असे देकार मागवतानाच स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीने राष्ट्रीय खेळांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी गोवा क्रीडा प्राधिकरण आणि विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कामाच्या व्याप्तीमधील प्रमुख जबाबदाऱ्या...

निवास व्यवस्थापन : यामध्ये सहभागी आणि अधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, आरक्षण, खोली वाटप आणि संपूर्ण कार्यक्रमात आरामदायी मुक्काम सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

खानपान सेवा : एजन्सी कॅटरिंग सेवांसाठी जबाबदार असेल, ज्यामध्ये मेनूचे नियोजन, अन्न तयार करणे आणि सहभागी आणि कर्मचाऱ्यांना जेवण देणे, सर्वोच्च गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांचे पालन करणे समाविष्ट आहे.

वाहतूक लॉजिस्टिक्स : वाहतूक सेवांचे समन्वय साधणे, ज्यामध्ये क्रीडापटू, अधिकारी आणि उपकरणे यांची ठिकाणे आणि निवासस्थानांमधील हालचालींची व्यवस्था करणे समाविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com