Goa Sagar Mitra: ...तर राज्यात मत्स्यउद्योगाला सोनेरी दिवस; शाश्वत उत्पादनाकडे वळण्याचे मंत्री हळर्णकर यांनी केले आवाहन

गोव्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी 33 सागर मित्रांची नियुक्ती
Goa News | Fishing
Goa News | FishingDainik Gomantak

गोवा राज्यातील मत्स्यविभाग हा खाण क्षेत्राप्रमाणे राज्याच्या तिजोरीत भक्कम भर टाकू शकतो. फक्त राज्यातील युवकांनी या क्षेत्राकडे सकारात्मकपणे पाहणे आवश्यक असल्याचे मत्स्यव्यवसायमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा राज्यासाठी नुकतीच एक घोषणा करण्यात आली आहे. यानूसार आता गोव्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी 33 सागर मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे.

(33 sagar mitras appointed to promote fisheries across Goa)

Goa News | Fishing
Vikram Patwardhan IFFI 2022: छायापत्रकार एका दिवसात अनेकविध विश्वे अनुभवतो’

पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित योजनांवर मत्स्यव्यवसाय विभागाने आज बैठक घेतली या बैठकीस, मंत्री हळर्णकर यांच्यासह मत्स्यव्यवसाय खात्यातील पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस हजेरी लावली यावेळी मत्स्यव्यवसाय संचालक शमिला मोंटेरो म्हणाल्या की, गोव्याच्या किनारपट्टीवरील गावांमध्ये यापुढे सागर मित्र तैनात असतील.

यांच्या नियुक्तीचा उद्देश हा जलसंवर्धन योजनांना चालना देणे, मत्स्यपालनाशी संबंधित प्रशिक्षण, तांत्रिक माहिती देणे, योजनांसाठी फॉर्म भरण्यास मदत करणे हा आहे. त्यामुळे यापुढे मत्स्यव्यावसायिकांना याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Goa News | Fishing
Poor Road Condition: पणजीत रस्त्यांची दुरवस्था, माफी मागत महापाैरांनी केली मोठी घोषणा

या कार्यक्रमात बोलताना मत्स्यव्यवसाय मंत्री हळर्णकर म्हणाले, कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत या क्षेत्रात काम केल्यास व्यावसायिकांना अधिक उत्पन्न शाश्वतरीत्या मिळवता येईल. व अशा प्रयत्नांमुळे गोवा मत्स्य उत्पादनात स्वयं-शाश्वत उत्पादनाचा स्त्रोत्र होईल. असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आरंभीच्या टप्प्यात आपणास काही तांत्रिक अडचणी आल्यास राज्यातील या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाऊ शकते. यासाठी आवश्यक ती मदत घ्या असे आवहन ही यावेळी मंत्री हळर्णकर यांनी यावेळी केले. संवादादरम्यान हळर्णकर यांनी आपला फोन नंबरही उपलब्ध करून दिला जेणेकरुन लोकांना योजनांबाबत थेट त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com