Vasco News: वास्कोत 32 वर्षीय युवकाने गळफास घेत संपवले आयुष्य; कारण अद्याप अस्पष्टच

सुनील हा मूळचा बेल्लारी-कर्नाटक येथील असून तो एका केबल नेटवर्क कंपनीत कामाला होता.
Vasco Suicide News
Vasco Suicide NewsDainik Gomantak

Vasco Suicide News: वास्कोतील शांतीनगर येथे काल (शुक्रवारी) सकाळी एका 32 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील इसा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील हा मूळचा बेल्लारी-कर्नाटक येथील असून तो एका केबल नेटवर्क कंपनीत कामाला होता.

Vasco Suicide News
Goa Monsoon Update: राज्यात पाऊस पोहोचला 110 इंचांवर

सहा दिवसांपूर्वी त्याची आई त्याच्या मूळ गावी गेली होती आणि तेव्हापासून सुनील घरी एकटाच होता. काल (शुक्रवारी) सकाळी त्यांच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि कोणीही दरवाजा उघडत नसल्याने काहीतरी घडले असल्याचा संशय त्याच्या शेजाऱ्यांना आला.

बराच वेळ सुनील दार उघडत नाही म्हटल्यावर शेवटी शेजाऱ्यांनी वास्को पोलिसांना कळवले. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा तो खोलीत मृतावस्थेत आढळला. वास्को पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवागारात पाठवला असून शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पीआय कपिल नायक व मुरगाव डीवायएसपी सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विभा वोल्वईकर करीत आहेत. सुनीलच्या आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com