Cuncolim Hit & Run: भरधाव वाहनाच्या धडकेत 32 वर्षीय तरुण ठार, वाहन चालकाचा घटनास्थळावरुन पळ

Cuncolim Accident Case: अज्ञात वाहनाची ओळख अद्याप पटली नसून, पोलिस अधिक तपास करतायेत.
Cuncolim Hit & Run Case
Cuncolim Accident CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: येथे हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ वर हा अपघात झाला. रस्ता खूप अरुंद असल्याने अपघात झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

संंतोष नाईक (वय ३२, रा. कुंकळ्ळी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पायी चालत घरी जात असताना एका भरधाव वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. अज्ञात वाहनाची ओळख अद्याप पटली नसून, पोलिस अधिक तपास करतायेत.

Cuncolim Hit & Run Case
Neura: अपघाती मृत्यू झालेल्या मजुराच्या कुटुंबाला दिलासा! मोटार लवादाने दिला 39.47 लाख भरपाईचा आदेश

स्थानिकांकडून बायपास मार्गाची मागणी

अपघातानंतर कुंकळ्ळी स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत गर्दी केली. राष्ट्रीय महामार्ग १७ खूप अरुंद असल्याने हा अपघात झाल्याचे मत स्थानिकांनी नोंदवले. दरदिवशी या ठिकाणी अपघात होतो असे म्हणत, या महामार्गाला बायपास मार्ग निर्माण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

America Double Murder Case
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Sexual Assault Case Khorlim Mapusa
Jaipur Hit And Run Accident Ajmer Road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com