Goa Assembly: बनवाट 'गोवा काजू' विकल्याप्रकरणी 23 जणांवर कारवाई; तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
CM Pramod SawantX Social Media

Goa Assembly: बनवाट 'गोवा काजू' विकल्याप्रकरणी 23 जणांवर कारवाई; तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Goa Assembly: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जोरदार घमासान पाहायला मिळत आहे.
Published on

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जोरदार घमासान पाहायला मिळत आहे.

यातच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या एका लेखी उत्तरात गेल्या दोन वर्षात बनावट 'गोवा काजू' विकल्याप्रकरणी 23 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

याशिवाय, 2.31 लाख रुपये म्हणून दंड म्हणून वसूल केले. आमदार कार्लुस फेरेरा यांनी काजू विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईचा तपशील सभागृहात सरकारकडे मागितला होता.

दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या 28 पैकी 23 जणांनी त्यांच्या पॅकिंगवर 'गोवा काजू' असे लिहिले होते. त्यांनी गोवा काजू लिहून ग्राहकांची फसवणूक केली. हे विक्रेते परदेशातून काजूच्या इतर जाती आयात करुन 'गोवा काजू' म्हणून विकत होते.

अशा विक्रेत्यांना 5000 ते 25,000 रुपये इतका दंड केला होता. त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 31हजार रुपये दंड म्हणून वसूल केले. याशिवाय, 1764 बनावट गोवा काजूची पाकिटेही जप्त करण्यात आली.

Goa Assembly: बनवाट 'गोवा काजू' विकल्याप्रकरणी 23 जणांवर कारवाई; तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
Goa Assembly Monsoon Session: प्रत्येक घराला मिळणार इंटरनेट कनेक्शन, स्टार्टअपमध्ये 30 टक्के महिला; सभागृहात काय घडलं?

याशिवाय, कळंगुटमधील (Calangute) 10 काजू आणि सुकामेवा विक्रेत्यांवर कारवाई केली. तर उर्वरित कारवाई म्हापसा, पेडणे, तिसवाडी, खोर्ली, कोलवा, केळशी आणि कुडचडे येथे करण्यात आली. संबधित खात्याने 2022 ते 2023 मध्ये तब्बल 13 ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. तर 2024 मध्ये आतापर्यंत कारवाई केली आहे.

Goa Assembly: बनवाट 'गोवा काजू' विकल्याप्रकरणी 23 जणांवर कारवाई; तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
Goa Assembly: गोव्याबाबत भारतीय काय विचार करतात? आमदाराने अधिवेशनात सांगितला मजेशीर किस्सा

याशिवाय, कारवाईचा भाग म्हणून खात्याने विक्रेत्यांकडून त्यांचा बनावट माल देखील जप्त केला. तर एकूण चार गुन्हे दाखल केले. केवळ दोन जणांवर दडांत्मक कारवाई करण्यात आलेली नाहीये. मात्र त्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com