Goa Government Job: सरकारी नोकरी भरतीत गोव्यातील तरुणांवर अन्याय, 'आप'ने लिपिक पदाच्या एका अटीकडे वेधलं लक्ष

Government Job Experience Criteria: गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत लिपिक आणि स्टेनोग्राफर अशी एकूण २८५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांना या सरकारी नोकरीची आशा निर्माण झाल्या आहेत.
Goa Government Jobs
Government Jobs| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Staff Selection Commission Clerk Recruitment 2024

पणजी: गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत लिपिक आणि स्टेनोग्राफर अशी एकूण २८५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांना या सरकारी नोकरीची आशा निर्माण झाल्या आहेत, परंतु या पदांसाठी किमान एक वर्षांची अनुभव असण्याची जी अट घालण्यात आली आहे. त्याचा फटका राज्यातील अनेक इच्छुक युवकांना बसणार आहे, अशी भीती गोवा आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. रामराव वाघ यांनी व्यक्त केली आहे.

वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे, की राज्य सरकारने (Government) कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती करण्याचे ठरवले असले तरी ती प्रक्रिया पारदर्शी होणे आवश्यक आहे. पारदर्शक प्रक्रिया झालीतरच युवकांच्या मनातील संशय कमी होईल. गोव्यात २०-२५ वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या नाकारून शेजारील राज्यांतून आलेल्या लोकांना भरती केले जात आहे. या कर्मचाऱ्यांना स्थानिक भौगोलिक माहितीही नाही.

Goa Government Jobs
Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

लिपिक व स्टेनोग्राफरच्या पदांसाठी जी एक वर्षे अनुभवाची अट घातली आहे, ती राज्यातील युवकांसाठी फायदेशीर ठरणार नाही. अर्जांची मोठी विक्री झाली असली तरी अनुभवाच्या अटीत ते कमी पडू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com