Valpoi News: जखमी गाईच्या पोटातून काढला 4 वर्षांपासून साठलेला 27 किलोंचा प्लॅस्टिक कचरा!

वाळपई गोसंवर्धन केंद्रातर्फे बेवारस गाईला जीवनदान
Valpoi News
Valpoi NewsDainik Gomantak

Valpoi News: दिवसेंदिवस वाळपई शहरात बेवारस गुरे तसेच प्लास्टीक कचरा खाण्याच्या प्रकार वाढत आहे. आज (शनिवार) वाळपई नाणूस येथील गोसंवर्धन केंद्रात अश्याच एका भटक्या व बेवारस गायीच्या पोटातून शस्त्रक्रिया करुन सुमारे 27.9 किलो प्लास्टिक काढण्यात आले आहे. यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Valpoi News
Goa Live Update: पाशेको दांपत्य उतरणार निवडणूक रिंगणात!

उपलब्ध माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी नाणूस वाळपई येथून जखमी अवस्थेत एका लहान वासराला गोशाळेत उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यादरम्यान उपचार सुरु असताना त्या वासराच्या आईचा शोध घेण्यात आला.

त्या गाईला शोधून आणल्यानतंर कळाले की त्या वासराचा आणि गायीचा अपघात झाला होता. त्यांच्या पायावर जखमा झाल्या होत्या. गायीवर वेळीच उपचार झाला नसता तर त्या जखमा वाढल्या असत्या.

वाळपई गोशाळेत आणल्यानतंर तिच्यावर उपचार करण्यात आले व तिची प्रकृती सुधारत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या गायीने जेवण खाणे बंद केले होते. वाळपई गोशाळेतर्फे तिची चांगल्या पध्दतीने देखभाल करण्यात येत होती.

त्यानंतर डाॅ. रघुनाथ धुरी यांनी तिची तपासणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले ती त्या गायीच्या पोटात प्लॅस्टिक कचरा आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 3 तास लागला. त्यात सुमारे 27. 9 किलोचा प्लास्टिक व इतर कचरा बाहेर काढण्यात आला. त्या गायीचे वय सुमारे 7 वर्षे असून गेल्या 4 वर्षांपासूनचा प्लास्टिक कचरा तिच्या पोटात साठवलेला होता.

आता त्या गायीची प्रकृती चांगली असून काही दिवसात ती बरी होणार असल्याचे डाॅ. रघुनाथ धुरी यांनी सांगितले. यावेळी धुरी यांना सोहन पार्सेकर व अमेय कुट्टीकर यांनी शस्त्रक्रियाकरण्यासाठी सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com