उत्तर गोव्यातील 27 बार व रेस्टॉरंट्सना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका! प्रतिज्ञापत्र खंडपीठात सादर

Goa State Pollution Control Board: प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसल्याने बंद करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मंडळाने गोवा खंडपीठात सादर केली
Goa Bench: प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसल्याने बंद करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मंडळाने गोवा खंडपीठात सादर केली
Goa State Pollution Control BoardDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोवा किनारपट्टी भागातील २७ बार व रेस्टॉरंट्सना व्यवसाय चालविण्याचा (कन्सेन्ट टू ऑपरेट) प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसल्याने ते बंद करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मंडळाने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली.

किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या मूळ याचिकेत डेस्मंड अल्वारिस यांनी अवमान याचिका सादर केली आहे. त्या अवमान याचिकेनंतर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करण्याची जाग आली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या २७ व्यावसायिकांना नोटीस बजावून व्यवसाय बंद करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये हणजूणमधील ११, वागातोरमधील ९, आसगावमधील ४ तर शापोरा,वझरांत व हणजूण-शिवोली येथील एका बार-रेस्टॉरंट्सचा समावेश आहे.

प्रदूषण मंडळाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना २२ जुलै २०२४ रोजी पत्र पाठवून हे बार रेस्टॉरंट्सविरोधात कारवाई करून त्याचा अहवाल मंडळाला पाठवावा, असे म्हटले आहे. हणजूणमधील व वागातोर येथील चार व्यवसाय त्वरित बंद करावेत, असे त्यात स्पष्ट केले आहे. त्यामध्ये रिथ, निओमेसो प्रा.लि. (मयान बीच क्लब), झिकी रेस्टॉरंट, मे. सोनिक याचा त्यामध्ये समावेश आहे. मंडळाने आणखी चार व्यावसायिकांचे अर्ज अर्धवट असल्याने ते फेटाळून त्यांचाही व्यवसाय बंद करण्यास सांगितले असल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली आहे.

Goa Bench: प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसल्याने बंद करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मंडळाने गोवा खंडपीठात सादर केली
Goa Pollution Control Board: सांडपाणी प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडले; खत कंपनीला २२ लाखांचा दंड

‘कन्सेट टू ऑपरेट’ची प्रकरणे

१) हणजूण येथील मे. एलिफंट बीच कॅफेने २१ मे २०२४ रोजी कन्सेट टू ऑपरेट परवान्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला होता. या अर्जातील माहिती अपुरी असल्याने तसेच विचारलेल्या प्रश्‍नांचे स्पष्टीकरण दिले नसल्याने व्यवसाय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवावा, असे मंडळाने म्हटले आहे.

२) मे. ॲमनियू या व्यावसायिकाला २२ जुलै २०२४ रोजी ते परवाना नसताना व्यवसाय करत असल्याचे मंडळाने कळविले आहे. आसगाव येथील मे. सेक व मे. नोहा या दोन व्यावसायिकांनी कन्सेट टू ऑपरेटसाठी केलेल्या अर्जावरील निर्णय मंडळाकडे प्रलंबित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com