25 टक्के विद्यार्थ्यांना दहावीनंतर शाळा नको

राष्ट्रीय कुटूंब आरोग्‍य सर्वेक्षणातील चिंताजनक माहिती, विद्यार्थी सोडत आहेत शिक्षण
Students in Goa
Students in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्‍यात दहावी होण्यापूर्वीच शाळा सोडण्याच्‍या प्रमाणात घट झाली असल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने 2019-20 दरम्‍यान केलेल्‍या राष्ट्रीय कुटूंब आरोग्‍य सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे. शाळा सोडण्याच्‍या प्रमाणात घट झाली असली तरी अद्यापही राज्‍यात सुमारे 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थी दहावीपूर्वीच शाळा सोडत असल्‍याचे या अहवालावरून निष्पन्न झाले आहे.

शिक्षणतज्‍ज्ञ अनिल सामंत यांच्या म्हणण्यानुसार, या अहवालातील आकडेवारी कोरोना महामारीच्‍या काळातील आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम की ऑफलाईन या घोळात अनेक विद्यार्थ्यांनी पुढील वर्षासाठी शाळांत प्रवेशच घेतला नाही. या काळात राज्‍यात विविध कामांवरील स्‍थलांतरित मजूर आणि कामगारांनी आपापले गाव गाठल्‍याने त्‍यांच्‍या मुलांनी शाळा सोडल्‍या. विशेषतः प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात अधिक समावेश असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राज्‍यात एकूण साक्षरतेचे प्रमाण 92 टक्‍यांपेक्षा अधिक असून 94.3 टक्के पुरुष साक्षर आहेत. तर महिलांची टक्‍केवारी 92.2 इतकी आहे. याचबरोबर साधारणपणे 25 टक्‍के व्‍यक्‍तींनी कधीही इंटरनेटचा वापर केला नसल्‍याचेही या अहवालात म्‍हटले आहे. 27 टक्‍के महिलांनी तर 18 टक्‍के पुरुषांनी कधीही इंटरनेटचा वापर केलेला नाही.

Students in Goa
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरों (22nd May 2022)

शाळा सोडल्यानंतरची सर्वात गंभीर बाब म्‍हणजे काही मुले किनारी भागात चालणाऱ्या अवैध आणि अनैतिक व्‍यवहारातही वावरत असताना दिसून येतात. खासकरून ही मुले ड्रग्‍जसारख्या व्‍यवहारात अडकत आहेत. तसेच गरिबी ही एक महत्त्वाची बाब असून मूळ गोमंतकीय गरीब नाहीत. मात्र, बाहेरून येथे येऊन काम करणाऱ्यांबाबत ही समस्या दिसून येते. गरिबीमुळे खासकरून कामगार-मजूर वर्गात मोडणारे आई-वडील मुलांना हव्‍या त्‍या साधन-सुविधा देऊ शकत नसल्‍याने अनेक मुले शाळा सोडतात, अशीही महत्त्वाची माहिती अनिल सामंत यांनी दिली.

दहावीपूर्वी शिक्षण सोडणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण 29 टक्‍के असून मुलांचे प्रमाण 24 टक्‍के असल्‍याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2015-16 च्‍या अहवालातील नोंदीनुसार दहावीपूर्वी शाळा सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण तब्बल 42 टक्के होते. तर मुलांचे प्रमाण 37 टक्‍के होते. म्‍हणजेच 2016 ते 2020 दरम्‍यान दहावीपूर्वी शाळा सोडणाऱ्यांच्‍या प्रमाणात घट झाली असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com