Goa Legislature: आमदार प्रशिक्षणावर 25 लाखांचा चुराडा

आरटीआय- विधीमंडळ खात्याची लपवाछपवी समोर- ॲड. रॉड्रिग्ज
Goa Legislature
Goa LegislatureDainik Gomantak

गत वर्षी गोवा विधिमंडळ खात्याने नवनिर्वाचित आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेवर 24 लाख 96 हजार 500रुपये खर्च केला. ही माहिती खात्याने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांना माहिती हक्क कायद्याखाली देण्यास नाकारली होती.

मात्र, मुख्य माहिती आयोगाने खात्याला दणका दिल्यानंतर ती देण्यात आली आहे. कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी मुंबईस्थित एनजीओ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेकडे होती.

आरटीआय अंतर्गत ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी या कार्यशाळेवरील संपूर्ण खर्चाची माहिती विधीमंडळ खात्याकडे मागितली होती. गोवा विधानमंडळ सचिवालयातील जन माहिती अधिकारी मोहन गावकर यांनी माहिती देण्यास नकार दिला.

या माहितीमुळे विधानसभेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल आणि कामकाजाच्या नियमावलीच्या नियम ३७(१६) च्या विरोधात असेल, असे सांगितले होते. त्या आदेशाला ॲड. रॉड्रिग्ज यांनी विधिमंडळ सचिव असलेल्या प्रथम अपील प्राधिकरणाकडे अर्ज केला होता.

मात्र, त्यांनीही तो फेटाळला. त्यामुळे अखेर त्यांनी मुख्य माहिती आयोगाकडे आव्हान दिल्यावर विधिमंडळ खात्याला दणका देत आयुक्तांनी ती माहिती १५ दिवसांच्या आत देण्याचे निर्देश दिले होते.

Goa Legislature
Colvale jail: ‘कोलवाळ’मध्ये रोलिंग पेपर्स; जेलगार्ड निलंबित

असा झाला खर्च-

1) मुंबईस्थित एनजीओ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेला 24 लाख 13 हजार 100 रुपये देण्यात आले आहेत.

2) आमदार उल्हास तुयेकर, कृष्णा साळकर यांच्या फ्रेमसह फोटोग्राफीसाठी 80 हजार तर व्हिडिओग्राफीसाठी 3400 रुपये खर्च.

3) राजेंद्र आर्लेकर, डॉ. अनंत काळसे, डॉ. हरीश शेट्टी, राम नाईक, देश दीपक वर्मा आणि सतीश महान या प्रशिक्षकांवर 4 लाख 50 हजारांचा खर्च.

4) स्टेज सजावट आणि स्मृतिचिन्ह यासाठी 2 लाख तर आमदारांच्या चहापानावर 5 लाखांचा खर्च करण्यात आला.

5) कार्यशाळेसाठी तारांकित ताज विवांता येथील जागेच्या भाड्याची जमा केलेली रक्कमेचा या माहितीत उल्लेख केलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com