Indian Passport
Indian PassportDainik Gomantak

शिक्षण, नोकरी अन् भविष्याचा विचार! दररोज 25 गोमंतकीय करतायेत भारतीय पासपोर्ट सरेंडर, पोर्तुगीज नागरिकत्वासाठी वाढती धडपड

Goans Surrender Indian Passport: गोव्याचा वसाहतवादी इतिहास आजही अनेकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहे. सध्या दररोज सुमारे 25 गोमंतकीय आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर करत आहेत. पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्यासाठी लोक भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत.
Published on

पणजी: गोव्याचा वसाहतवादी इतिहास आजही अनेकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहे. सध्या दररोज सुमारे 25 गोमंतकीय आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर करत आहेत. पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्यासाठी लोक भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत. पोर्तुगिज नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये विशेषतः दक्षिण गोव्यातील अल्पसंख्याक समुदायातील लोक मोठ्याप्रमाणावर आहेत. परदेशात अधिक चांगला रोजगार आणि शिक्षणासाठी हे नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतराच्या दिशेने पावले टाकत आहेत.

इतिहासाशी असलेली जोड कायम

गोवा (Goa) 1961 पर्यंत पोर्तुगालच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे 1961 पूर्वी जन्मलेले किंवा त्यांचे वंशज असलेले लोक पोर्तुगीज नागरी हक्कांसाठी पात्र ठरु शकतात. या अधिकाराचा लाभ घेत अनेकांनी पोर्तुगीज नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. पोर्तुगीज नागरिकत्व मिळाल्यानंतर युरोपियन युनियनमधील कोणत्याही देशात राहण्याची, काम करण्याची आणि शिक्षण घेण्याची मुभा मिळते, हे या प्रक्रियेचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

Indian Passport
CM Pramod Sawant visit GMC: मुख्यमंत्री जीएमसीत कॅज्युअलिटी वॉर्डला देणार भेट, डॉक्टरांनाही भेटणार

गोंधळ आणि स्पष्टता

2022 मध्ये O.C.I. (ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया) संदर्भातील पात्रता नियमांमध्ये बदल झाल्याची अफवा पसरली होती, ज्यामुळे गोव्यात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अनेकांनी असा अंदाज बांधला की, पोर्तुगीज नागरिकत्व घेणाऱ्यांना O.C.I. कार्ड नाकारले जाईल. मात्र, केंद्र सरकारने स्पष्ट केले की पोर्तुगीज-गोवेकर अजूनही O.C.I. कार्डसाठी पात्र आहेत, जर त्यांनी नागरिकत्वाच्या प्रक्रियेची योग्य कागदपत्रे सादर केलीत.

पासपोर्ट सरेंडर प्रक्रियेत दलालांचा सुळसुळाट

भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्याची ऑनलाइन फी केवळ 500 आहे. तरीही, अनेक लोक दलालांच्या सापळ्यात अडकत आहेत. नागरिकांनी थेट अधिकृत वेबसाइटवरुन अपॉइंटमेंट घेऊन अर्ज करावा, असे आवाहन यासंबंधी पणजी पासपोर्ट कार्यालयाने केले.

Indian Passport
Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण

दिवसाला 350 अपॉइंटमेंट्स

पणजी पासपोर्ट कार्यालय सध्या दिवसाला 350 अपॉइंटमेंट्स स्वीकारते. यावरुन स्पष्ट होते की, गोव्यातून परदेशात स्थायिक होण्याचा कल वाढत आहे. शिक्षण (Education), नोकरी आणि आर्थिक स्थैर्य यासाठी गोमंतकीय मोठ्या प्रमाणावर युरोप, विशेषतः यूके आणि इतर युरोपियन देशांमध्ये स्थायिक होऊ इच्छित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com