Bharati Branch Post Office at Bharati Station, Antarctica: राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राच्या 24 व्या स्थापना दिनानिमित्त आज टपाल कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल के.के.शर्मा यांनी हे उद्घाटन केले. अतिदुर्गम भागाला जगाशी कनेक्ट करण्यासाठी अंटार्क्टिकामधील भारती स्टेशन येथे टपाल कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, भारती स्टेशनवरील पोस्टकार्डचेही यावेळी प्रकाशनही करण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल के.के. शर्मा यांनी टपाल कार्यालयाचे महत्त्व अधोरेखीत केले. आपल्या भाषणादरम्यान शर्मा म्हणाले की, 'भारती टपाल कार्यालय हे अंटार्क्टिकामध्ये स्थापन होणारे तिसरे कार्यालय आहे.'
शर्मा पुढे म्हणाले की, ''अंटार्क्टिकामध्ये पहिले टपाल कार्यालय हे 1984 मध्ये दक्षिण गंगोत्रीमध्ये स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 6 वर्षांनी 1990 मध्ये मैत्री स्टेशनवर दुसरे टपाल कार्यालय स्थापन करण्यात आले. आता तब्बल 40 वर्षांनंतर तिसरे टपाल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या टपाल कार्यालयाचा मुख्य उद्देश हा जगातील अतिदुर्गम भागाला जगाशी कनेक्ट करण्याचा आहे. यामधून अतिदुर्गम भागातही सेवा प्रदान करण्याची टपाल विभागाची बांधिलकी अधोरेखित होते.''
दुसरीकडे, या कार्यक्रमासाठी अनेक प्रमख व्यक्तींनी हजेरी लावली. यामध्ये पोस्टमास्टर जनरल, मेल आणि बीडी अमिताभ सिंह, गोव्याच्या एनसीपीओआरचे संचालक डॉ. थमन मेलोथ. त्याचबरोबर समूह संचालक डॉ. शैलेंद्र सैनी, समूह संचालक डॉ. राहुल मोहन, शिवाय, महाराष्ट्र मंडळाचे संचालक अभिजीत बनसोडे, गोवा विभागाच्या टपाल सेवेचे संचालक आर. पी. पाटील यांच्यासह मैत्री स्टेशन आणि भारती स्टेशनचे टीम लीडर देखील या कार्यक्रमासाठी दूरस्थ माध्यमातून या जोडले गेले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.